शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत - मंजुरीच्या अंतिम टप्प्यात अडकलेय मेडिकल कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:53 IST

मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास १०० पेक्षा अधीक डॉक्टर, प्राध्यापक, मिळणार आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवरील ताण मिटणार आहे. - डॉ.शिवाजी सुकरे.

मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासूनचे जिल्हावासीयांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता केवळ एका मंजुरीसाठी अडकले आहे. एमसीआयची ‘ती’ मंजुरी मिळताच याच शैक्षणिक वर्षापासून कॉलेज सुरू होणार आहे. आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ.शिवाजी सुकरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया यंदा सुरू होणार का?मेडिकल कॉलेजची सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. एमसीआयने काही त्रुटी काढल्या होत्या त्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. त्याचा परिपुर्ण अहवाल देखील त्यांना पाठविला आहे. परंतु कोरोनामुळे कमिटीचा दौरा होऊ शकला नाही. एमसीआयने मंजुरी देताच लागलीच पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.कॉलेज सुरू झाल्यास आवश्यक सोयी, सुविधा आहेत का?मेडिकल कॉलेजसाठी लागणाºया सर्व बाबी येथे तयार आहेत. सिव्हीलचे हस्तांतरण झालेले आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे शरिर रचना शास्त्र विभाग. शरिर प्रक्रिया शास्त्र विभाग. जीव रसायन शास्त्र विभाग तयार आहेत. आवश्यक असलेले ३०० बेडपैकी ३१४ बेडचे रुग्णालय उपलब्ध आहे. लायब्ररीसाठी अभ्यासक्रमाची व संदर्भ ग्रंथांच्या १५०० पुस्तके उपलब्ध होत आहेत. व्याख्यानकक्ष, प्रयोगशाळा यांची उपलब्धता पुर्ण झाली आहे.पदनिर्मिती मंजुर आहे का?प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे.सिव्हीलचे हस्तांतरण झाल्याने ९० टक्के कर्मचारी आहेत. याशिवाय १०५ डॉक्टर, प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीसाठी हायपॉवर कमिटीकडे प्रस्ताव दिला आहे. लवकरच ती प्रक्रियाही पुर्ण होणार आहे.देशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेजसंदर्भात केंद्राचे धोरण आहे. राज्यातून नंदुरबारचा त्यात समावेश आहे. एकदाचे कॉलेज सुरू झाल्यास केंद्राकडून मोठा निधी मिळणार आहे. यासंदर्भात झालेल्या देशव्यापी बैठकीला आपण राज्याच्या वतीने उपस्थित होतो.राज्याच्या हायपॉवर कमिटीची बैठक व्हावी यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, लोकप्रतिनीधी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड स्वत: प्रयत्नशील आहेत. ही बैठक झाल्यास प्रवेश प्रक्रियेचा आणि इतर बाबींचा मार्ग मोकळा होणार आहे.सध्या कोवीडच्या पार्श्वभुमीवर सिव्हीलवर मोठा ताण आहे. जर मेडिकल कॉलेज सुरू झाले तर इतर यंत्रसामुग्री उपकरणे वाढून मिळतील. व्हेंटीलेटरची संख्या वाढेल, डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण सेवेचा ताण बºयाच प्रमाणात कमी होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.