शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट निपटण्यासाठी सुजालपूरचे सराहनीय पाऊल; गावातील सर्व नागरिकांची सामूहिक आरटीपीसीआर तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

सुजालपूर, ता.नंदुरबार गावालाही याचा फटका बसला असून, अनेक लोक यामुळे बाधित झालेत. परंतु याचं संक्रमण अधिक पसरू नये आणि ...

सुजालपूर, ता.नंदुरबार गावालाही याचा फटका बसला असून, अनेक लोक यामुळे बाधित झालेत. परंतु याचं संक्रमण अधिक पसरू नये आणि लोकांना अजून क्षती पोहचू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत, गावातील सर्व नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि गावातील सर्व नागरिकांनी या कोरोना महामारीला गावातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा रूग्णालय नंदुरबार येथे संपर्क करून आरोग्य पथक गावात बोलावून सर्व ग्रामस्थांची कोरोना तपासणी करून घेतली.

यात गावातील १६२ लोकांची तपासणी केली आणि यात काही गावकरी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी विलगीकरण करण्यात आले. ज्यांना तत्काळ उपचार व हाॅस्पिटलची गरज होती त्यांना तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि इतर नागरिकांना यापासून बचावाच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावात कोरोनाचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी ग्रामवासीयांनी न घाबरता योग्य वेळेत हा निर्णय घेतल्यामुळे मोठे नुकसान होण्यापासून वाचले.

अशा प्रकारे प्रत्येक गावात व परिसरात सामूहिकरित्या कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली तर कोरोना व्हायरसचा प्रसार व संक्रमण रोखण्यासाठी निश्चित खूप मोठी मदत होऊ शकेल.

सुजालपूर गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, लसीकरणासाठी देखील या गावाने पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक ऑनलाईन नाव नोंदणी सुरू केलेली आहे आणि तोपर्यंत सर्व नागरिकांना डबल मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे हे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गावकरी व मुले स्वयंस्फूर्तीने हे नियम पाळत आहेत. तसेच कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून सध्या गावात सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, बैठका, भजन, आदींना स्थगिती देण्यात आली आहे.