शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात विजेच्या लपंडावाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

बाधितांचे व्यायामवर्ग नंदुरबार : जिल्ह्यातील ९ कोविड केअर सेंटर्समध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून इतर रुग्णांमध्ये आत्मविश्वास ...

बाधितांचे व्यायामवर्ग

नंदुरबार : जिल्ह्यातील ९ कोविड केअर सेंटर्समध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून इतर रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. दाखल असलेल्या रुग्णांना हसत-खेळत ठेवण्यासाठी त्या-त्या ठिकाणी उपक्रम राबवण्यात येत आहेत. यांतर्गत सकाळी योगासन व व्यायाम वर्ग घेतले जात आहेत.

शहादा तालुक्यातील समस्या सोडवा

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. या गावांमध्ये गटारी नसल्याने सांडपाणी गटारींऐवजी रस्त्यांवर आल्याने साथरोगांची लागण होण्याची शक्यता आहे. तालुका प्रशासनाने कोरोनासोबतच इतर किरकोळ बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. याबाबत परिसरातील गावांमधून पाठपुरावाही करण्यात आला होता.

शेतकऱ्यांची लगबग

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी सकाळी व रात्री पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. यानंतर शेतकरी शेताकडे धावले होते. येत्या काळात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतीकामे तसेच शेतात ठेवलेला शेतमाल घराकडे नेण्याची लगबग बुधवारी शेतशिवारात दिसून येत होती.

हळदाणी शेतीकामांना गती

हळदाणी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात शेतीकामांना गती देण्यात आली आहे. या भागात सध्या खरीप पेरणीची तयारी सुरु आहे. नुकत्याच आटोपलेल्या रब्बी हंगामात या भागात रब्बी मूग, कांदा, भुईमूग या पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यांची काढणी पूर्ण झाली असल्याने खरिपाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. ढगाळ वातावरणामुळे येथील कामांवर दोन दिवस परिणाम झाला होता.

आंबा आवक वाढली

नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत आंबा आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅकडाऊनमुळे त्याची विक्री करणे शक्य होत नसल्याने व्यापारी आणि विक्रेते यांचे नुकसान होत आहे. दुपारी एक वाजेपर्यंतच्या वेळेत मिळेल तेवढा माल विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवत विक्रेते शहरात फिरत आहेत.

दुर्गम भागात जागृती

धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात प्रशासनासोबत स्थानिक युवक विविध माध्यमांतून जनजागृती करू लागले आहेत. यातून काेरोनापासून बचाव करण्याच्या उपाययोजना आणि लसीकरण वाढीची माहिती दिली जात आहे. युवकांकडून स्थानिक भाषेत संवाद साधला जात असल्याने अडचणी दूर होत आहेत.

बंधारा स्वच्छतेला गती द्यावी

नंदुरबार : तालुक्यातील खामगाव फाट्याजवळ शिवण नदीच्या बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येते. या पाण्याचा उपयोग शेतकरी शेती व पशुपालक हे गुरांसाठी करतात. परंतु गेल्या काही वर्षात हा बंधारा पूर्णपणे अस्वच्छ झाल्याचे दिसून आले आहे. शेवाळ आणि नागरिकांकडून टाकले जाणारे निर्माल्य यामुळे बंधा-याच कचरा साचत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होवून ग्रामस्थांनाही त्रासदायक ठरत आहे.

भाजीपाला आवक

नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक वाढल्याने किरकोळ बाजारात त्यांच्या दरात घसरण झाली आहे. शहरातील विविध भागात दुपारी एकपर्यंत भरणाऱ्या बाजारात मेथी, फ्लाॅवर, पालक, कोथिंबिर अत्यंत अल्प दरात विक्री होत आहे. उन्हाळा असतानाही या भाज्यांचे दर कमी आहेत.

टरबूज आवक घटली

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात टरबुजाची लागवड केली गेली होती. यातून दोन महिन्यांपासून बाजारात टरबुजाची आवक वाढली होती. दरम्यान, तीन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि रिपरीप पाऊस यामुळे उत्पादन काहीअंशी खराब झाल्याने बाजारात टरबूज आवक कमी झाली.