शहादा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST2021-04-30T04:39:03+5:302021-04-30T04:39:03+5:30

महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यामिनी गिरासे, पल्लवी भाेई, जयवंती वळवी, पूनम पावरा, अनिता गिरासे यांनी शहादा तालुक्यातील कातरी कोठली, धडगाव ...

Success of Shahada College students | शहादा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

शहादा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यामिनी गिरासे, पल्लवी भाेई, जयवंती वळवी, पूनम पावरा, अनिता गिरासे यांनी शहादा तालुक्यातील कातरी कोठली, धडगाव तालुक्यातील खामला व धडगाव शहरात प्रत्यक्ष महिलांची भेट घेऊन कोविडची लस अत्यंत प्रभावी असून, त्याच्यामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते, प्रतिकारशक्ती तयार होते. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा व अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येकाने विशेषत: महिलांनी लस घ्यावी असे आवाहन करून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समजून सांगितले. मास्कचा वापर करावा, जीवनात आता मास्क अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग कायमस्वरूपी पाळा, विनाकारण कोणत्याही कार्यक्रमांना उपक्रमांना जाऊ नये, घरातच थांबावे असेदेखील त्यांनी समजून सांगितले. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव, सचिव वर्षा जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. भारत चालसे, प्रा. शोभा अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी कोविडची लस कशी असते, ती कशी दिली जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

Web Title: Success of Shahada College students