पीक प्रात्यक्षिके, बियाणे, मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:32+5:302021-05-20T04:32:32+5:30

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य बियाणांसाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये प्रतिकिलो. संकरित ...

Subsidies to farmers for crop demonstrations, seeds, mini kits | पीक प्रात्यक्षिके, बियाणे, मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांना अनुदान

पीक प्रात्यक्षिके, बियाणे, मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांना अनुदान

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य बियाणांसाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये प्रतिकिलो. संकरित बाजारी बियाणांसाठी १० वर्षांआतील वाणास १०० रुपये प्रतिकिलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाच्या बियाणांसाठी १० वर्षांआतील वाणास ३० रुपये रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाणांसाठी १० ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भूसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून, संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनीकीट तूर, कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनीकीट देण्यात येईल. तूर ४१२ रुपये प्रति चार किलो मिनीकीटप्रमाणे अनुदान देण्यात येणार असून, बियाणे मिनीकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळवले आहे.

Web Title: Subsidies to farmers for crop demonstrations, seeds, mini kits