शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- नर्मदा विस्थापीतांच्या न्याय लढ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:52 IST

अमेरिकेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार २१ वर्षांपासून सातपुड्यात नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे. युवा अवस्था त्यातच गेली. चळवळीच्या या लढ्याची दखल घेतली गेल्याने समाधान आहे. -चेतन साळवे.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कगेल्या २१ वर्षांपासून विस्थापीतांना न्याय देण्यासाठी लढत आलो आहे. दऱ्याखोऱ्यातील वंचितांना जेंव्हा न्याय मिळतो तेंव्हा आपल्या कामाचे चिज झाल्याचे समाधान असते. आजही या भागात काम करण्यासारखे बरेच काही आहे. माझ्यासारख्या युवकाला ते खुणावत आहे. माझ्या गेल्या २१ वर्षातील कार्याची अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनने घेतलेली दखल वंचितांच्या न्याय लढ्यासाठी बळ देणारी असल्याची माहिती अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा युवा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झालेले आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे सक्रीय कार्यकर्ते चेतन साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

नर्मदा आंदोलनात आपण कधीपासून आहात?पूर्वी पासूनच मला वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ओढ होती. योगायोगाने मी नर्मदा आंदोलनाशी जोडलो गेलो. आज त्याला २१ वर्ष झाली आहेत. मेधाताई पाटकर यांचे नेतृत्व आणि त्यांचे विचार प्रभावीत करतात. त्यांच्या विचारनेच आज मी काम करीत असून वंचीतांना आणि बाधीतांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. माझ्या सारख्या युवा कार्यकर्त्यास नर्मदा आंदोलनात काम करण्यास वाव असून ती एक मोठी संधी असल्याचे मी मानतो.काम करतांना काय अडचणी आल्या?सातपुड्याच्या द-याखो-यात विस्थापीतांना न्याय देण्यासाठी विविध कामे केली. त्यात सरदार सरोवर विस्थापीतांच्या पुनर्वसनाचे काम, शासनाची जमीन पहाणी व पसंती, पुनर्वसन नियोजन समिती, जीवन शाळांना सहकार्य, नर्मदा फुगवट्यातील पाणलोट क्षेत्रात  मासेमारी संस्था स्थापन करून रोजगार मिळवून देण्यासह आलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. हे काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काम करतांना अडचणी येतात हे गृहीत धरूनच या कार्याला झोकुन दिले आहे.

 

महाराष्ट्र फाऊंडेशन... अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील लोकांनी हे फाऊंडेशन स्थापन केले आहे. दरवर्षी विविध कॅटेगरीतून फाऊंडेशनतर्फे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी महाराष्ट्रात एक समिती आहे ती समिती प्रत्येक कॅटेगरीतील तीन नावे पाठवते. अमेरिकेत त्यातील एक नाव अंतीम केले जाते. यंदा युवा कॅटेगरीतून चेतन साळवे यांची निवड करण्यात आली आहे.व्हीडीओ व्हॅालंटरी.. व्हीडीओ व्हॅालंटरी या संस्थेसोबत चेतन साळवे हे २०१५ पासून जोडले गेले आहेत. समुदाय संवाददाता म्हणून ते काम करतात. बेस्ट इम्पॅक्ट व बेस्ट व्हिडीओचे दोन राष्ट्रीय पुरस्कार साळवे यांना दिले गेले आहेत.कार्याचा प्रचार...  महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे यंदा कोरोनामुळे पुरस्कार वितरण होणार नाही. पुढील वर्षी पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. परंतु त्यांच्या कार्याची व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला जाणार आहे. त्याचे चित्रीकरण नुकतेच पुणे येथे झाले.