शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे ग्रामीण भागात लसीकरण जनजागृतीवर पथनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

ग्रामीण भागात कोरोनाच्या लसीकरण संदर्भात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरमज दूर करून ग्रामस्थांची लसीकरणासाठी मानसिक तयारी करण्यासाठी ...

ग्रामीण भागात कोरोनाच्या लसीकरण संदर्भात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरमज दूर करून ग्रामस्थांची लसीकरणासाठी मानसिक तयारी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व तथापि ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्याभरात पथनाट्यातून जनजागृती अभियान यात्रा सुरू आहे. या जनजागृती अभियान यात्रेदरम्यान नंदुरबार तालुक्यातील भादवड या गावातील ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले नाही, अश्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांचे लसीकरण संदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर करून नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चला सुरक्षित होऊ या... या पथनाट्याचा प्रयोग सादर करण्यात येऊन तेथील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. या वेळी भालेर केंद्रातील कृतीदल प्रमुख तथा केंद्रप्रमुख वसंत पाटील, भादवडचे सरपंच सविता चंद्रकांत पाटील, बलदाणेचे सरपंच रागिनी पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील अशोक संभू पाटील, ग्रामसेवक अनिल राठोड, तलाठी, कोतवाल प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

या जनजागृती रॅलीतून स्थानिक भाषेत नागरिकांना आवाहन करणारे सुमन गावीत, भादवड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व्ही.एच. वळवी, बलदाने जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सतीष पाटील, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.एन. परदेशी, भालेर केंद्रातील कृती दलातील सर्व जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या जनजागृती यात्रेदरम्यान भादवड या गावासोबतच बलदाणे, होळतर्फे रनाळे, कलमाडी, खोंडामळी, कोळदे या गावातदेखील पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात नागसेन पेंढारकर व नाट्यकर्मी तुषार ठाकरे यांच्या समवेत दर्शन भावसार, कुलभूषण पाटील, तुषार पाटील, जगदीश शिरसाठ, मोहन पाटील, यश पाटील, मयुर सावंत या कलावंतांनी सहभाग घेतला.

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व तथापि ट्रस्टची ही कोरोना लसीकरण जनजागृती यात्रा अशीच जिल्ह्याभरात फिरून लसीकरणाविषयी जनजागृती करणार आहे, असे रोटरी क्लब नंदनगरीतर्फे सांगण्यात आले.