लग्नात जेवणाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:57+5:302021-03-28T04:28:57+5:30

नंदुरबार : लग्नाच्या पंक्तीत जेवण करीत असताना अचानक मागून येऊन डोक्यात व पाठीत दगड घालून एकास जखमी केल्याची घटना ...

A stone was thrown at the head of the wedding diner | लग्नात जेवणाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

लग्नात जेवणाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

नंदुरबार : लग्नाच्या पंक्तीत जेवण करीत असताना अचानक मागून येऊन डोक्यात व पाठीत दगड घालून एकास जखमी केल्याची घटना खडकीच्या दुकानपाडा, ता.धडगाव येथे घडली. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोपड्या टेल्या नाईक व बोट्या डोपड्या नाईक असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रूमसिंग तंट्या नाईक असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, रूमसिंग नाईक हे खडकीच्या दुकानपाडा येथे लग्नात जेवण करीत असतांना डोपड्या व बोट्या नाईक तेथे आले. त्यांनी त्याला काही कळण्याच्या आतच मागून दगडाने मार केला. त्यात त्याचे डोके फुटले. तसेच हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात रूमसिंग नाईक हे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत रूमसिंग नाईक यांनी फिर्याद दिल्याने डोपड्या व बोट्या नाईक यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दिलीप सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: A stone was thrown at the head of the wedding diner