शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 78 ठिकाणी केला जाणार कोरोना लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:28 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जानेवारी महिन्यात कोरोना लसीचा डोस जिल्ह्यातील साधारण १२ हजारांच्या जवळपास कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मोठ्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जानेवारी महिन्यात कोरोना लसीचा डोस जिल्ह्यातील साधारण १२ हजारांच्या जवळपास कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर शासनाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या या लसींचा साठा करण्याची तयारी आरोग्य प्रशासनाने केली असून, यासाठी डिस्ट्रिक्ट व्हॅक्सिन स्टोरेज जिल्हा परिषदेच्या आवारात तयार झाले आहे.जिल्ह्यातील या प्रमुख स्टोरेजसोबत सर्व सहा तालुक्यात ७७ ठिकाणी आरोग्य विभाग पूर्वीपासून लसींचा साठा करतो आहे. याठिकाणीही क्षमतावाढीसह तयारी सुरू झाली आहे. एकूण ७८ ठिकाणी साठा होणारी कोरोनाची लस खराब होऊ नये यासाठी प्रशासनाने विजेचा २४ तास पुरवठा करण्याचे वीज वितरण कंपनीला सूचित केले आहे. प्रामुख्याने दुर्गम भागात होणाऱ्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लसीकरण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या याद्याही अंतिम टप्प्यात आहेत.शीतगृहांची जय्यत तयारीजिल्हा परिषदेच्या आवारात तयार केलेल्या जिल्हा शीतगृहात एक हजार ५०० लीटर क्षमतेचे १५ आयलर मागवण्यात आले आहेत. तसेच ७७ ठिकाणच्या रेफ्रीजरेटरची तपासणी करून नवीन काय हवे ते मागवले जात आहे. प्रत्येक ठिकाणी २४ तास वीज दिली जाईल याचेही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबरअखेर सर्व तयारी पूर्ण होणार आहे.

लस पोहोचविण्यासाठी १०० शासकीय वाहनेजिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ६० वाहने आहेत. तसेच प्रशासनाच्या सूचनेनुसार आणखी ४० वाहने तैनात होऊ शकतात. यातून १०० वाहनातून या लसींचा पुरवठा होऊ शकतो. ७७ चेन पाॅइंटसवर पोहोचून या लसींचा साठा करून ठेवला जाईल. पुढे तेथून पुढच्या पाॅइंटपर्यंत लसींचा पुरवठा होणार आहे. 

राज्य शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सुविधा निर्माण केल्या जात आहेत. जिल्हास्तरावर मोठा स्टोरेज केला जाईल. ज्यांचे लसीकरण होणार आहे. त्यांचा डाटा तयार केला गेला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व तयारी करून लसीकरणासाठी सज्ज राहणार आहे. कामकाज वेगात सुरू आहे.   - डाॅ. एन.डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.