शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील नागरिकांकडून विविध मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी सांबर पलासखोब्रा येथील २०१८-१९मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, या ...

तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी सांबर पलासखोब्रा येथील २०१८-१९मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, या घाट सेक्शनचे चढाव व वळणेदेखील कमी करण्यात येत नाहीत. तसेच आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीदेखील बांधल्या नसल्याने या रस्त्यावर एस. टी. महामंडळाची बस येऊ शकणार नाही. वेलखेडी, सांबर, पलासखोब्रा या रस्त्यावर दिगडबारी, साबाचापाडा, मोहाडीखेत, फाफालपाडा, बारीपाडा, आवलीपाडा या भागात वळणाचा भागदेखील कटिंग केला नसून, चारचाकी वाहनाचा टर्नदेखील लागत नाही, तर एस. टी. बस या मार्गावर कशी धावेल. घाटाचा भाग असतानादेखील चढाव कमी करण्यात आलेला नाही. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंतीसह संरक्षण कठडे नसल्याने रस्ता धोकादायक ठरत आहे. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने हे पाडे अद्याप अंधारात आहेत. डेब्रामाळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत असून, गावठाण स्मशानभूमी मोजणीचे काम पूर्ववत करून मिळावे, या मागण्यांसाठी वाघदेव बुदेमालपाडा येथे बेमुदत धरणे व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथील ग्रामसभेत करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री ॲड. पाडवी व तहसीलदार अजित शिंत्रे यांना डेब्रामाळच्या सरपंचांनी निवेदन दिले असून, या निवेदनावर रामसिंग वळवी कंजाला, भीमसिंग राज्या वळवी वेलखेडी, दिलीप कोट्या वळवी पलासखोब्रा, बटेसिग वळवी, राजेंद्र जहागीर वळवी, रमेश मोयला वळवी, सामा खात्र्या वळवी, सायसिंग रणज्या वळवी, दिवल्या सोमता वळवी, बिजला नायका वळवी यांनी दिले आहे.