शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सज्ज परंतु, प्रवासी येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये गरजू प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये दरदिवशी बसेस तैनात केल्या जात आहेत. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये गरजू प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये दरदिवशी बसेस तैनात केल्या जात आहेत. परंतु, बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासीच येत नसल्याने १ एप्रिलपासून जिल्ह्यात एकही बस धावलेली नाही.

लाॅकडाऊन काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून बसेस सुरू ठेवण्याचे आदेश होते. एकापेक्षा अधिक प्रवासी एका मार्गासाठी तातडीची कारणे घेऊन आल्यास त्यांना बसेस उपलब्ध करून देण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर आगारांतून प्रत्येकी १० बसेस तैनात ठेवल्या जात आहेत. या बसेसमधून एकापेक्षा अधिक प्रवासी ठोस कारणासह समोर आल्यास प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या २८ दिवसांपासून बंद असलेल्या बसेसमुळे चारही आगारांचे आतापर्यंत १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसचे चारही आगार मिळून दिवसाचे उत्पन्न हे सरासरी ४० लाख रुपये एवढे आहे. गेल्यावर्षी लाॅकडाऊननंतर सुरू झालेल्या एसटीने दिवाळीत भरारी घेतली होती. परंतु, आता पुन्हा एसटी बंद पडल्याने समस्यांमध्ये वाढ झाली आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर एसटीचे कामकाज सुरू झाल्यावर उत्पन्नाचे आकडे पूर्ववत करण्याचे आव्हान एसटीसमोर राहणार आहे. नंदुरबार आगारातून दिवसभरात मिळणारे साधारण १२ लाख, शहादा आगारातून ११, अक्कलकुवा ८ तर नवापूर आगारातून मिळणारे ९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगारांचे उत्पन्न बंद असल्याने कर्मचारी वेतनावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. एसटी बंद असली तरी चारही आगारांचे सर्व चालक, वाहक, यांत्रिकी, लिपिक कर्मचारी कामावर येत आहेत.

बसेस स्थानकात राहतात सज्ज

प्रवाशांच्या सोयीसाठी चारही आगारात बसेससोबत प्रत्येकी १० चालक आणि वाहक तैनात करुन ठेवण्यात आले आहेत.

वैद्यकीय कारणासह इतर तातडीच्या कारणांसाठी बसेसमधून प्रवास करण्यास मुभा असली तरी गेल्या २८ दिवसांत एकाही प्रवाशाने आगारांमध्ये संपर्क केलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी हे खासगी प्रवासी वाहनांमधून प्रवास करत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

कर्मचारी बसेस बाहेर

आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली असल्याने हे कर्मचारी सकाळी सात वाजेपासून कर्तव्यावर हजर होत आहेत. नंदुरबार व शहादा तसेच नवापूर येथून बसेस सुटण्याची शक्यता होती. परंतु, येथूनही बसेस सुटलेल्या नाहीत.

एसटी महामंडळाच्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. सकाळी किमान १० बसेस स्थानकात लावून ठेवण्यात येतात. या बसेससाठी कर्मचारीही तैनात असतात. परंतु, प्रवासी मात्र अद्याप मिळालेले नाहीत. एकापेक्षा अधिक प्रवासी आल्यास बसेस सोडल्या जातील, तशी तयारी आगाराने केली आहे. वैद्यकीय कारणांसाठी कागदपत्रे तपासली जातील.

-मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार