शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी रोखण्यासाठी पथके स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महसूल, जैव विविधता समिती व वृक्ष लागवड व संवर्धन समितीची बैठक घेवून आढावा घेतला.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे, गाºहाणे निराकरण प्राधिकरणाचे सचिव संदीप कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, कार्यकारी अभियंता अनिल पवार, अमरदिप पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, अनिल थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, इंडियन मेडीकल असोशिएशनचे डॉ. राजेश वळवी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी राहूल वाघ जिल्ह्यातील सर्व तहसिलदार गट विकास अधिकारी व संबंधित यंत्रणेचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वाळू सनियंत्रण समिती बैठकीत वाळूघाटांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करुन वाळू घाटांचे प्रस्ताव तात्काळ तहसिलदारांनी सादर करावे असे निर्देश दिले. तसेच तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू घाटांना नियमितपणे भेटी देवून तपासणी करावी. तसेच वाळूच्या अवैद्य वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर तात्काळ पथक कार्यान्वीत करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामांचा आढावा घेतांना प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण करावेत. खाजगी क्षेत्रावर, शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीचा उपक्रम शेतकºयांना आर्थिक लाभ देणारा असल्याने त्यांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच प्रत्येक विभागास सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्या असे सांगितले. महसूल विभागातील पुरवठा, गौणखजिन, टंचाई, निवडणूक, कुळवहिवाट, भुसंपादन, संजय गांधी योजना या विभागांचा आढावा घेण्यात आला.जैविक विविधता व्यवस्थापन संदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील समित्यांनी जैविक विविधता संदर्भात नोंदवह्यांमध्ये नोंदी घ्याव्यात व जैविक विविधतेचे काम मुदतीत पुर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित अधिकाºयांना दिल्या.वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दर वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचे चांगल्याप्रकारे संगोपन करुन जिल्ह्यात शंभर टक्के वृक्ष जगलेले दिसतील असे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.