नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:47+5:302021-05-03T04:24:47+5:30

नंदुरबार : नंदुरबारसह परिसरात रविवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाचा हलकासा शिडकावा झाला. साधारणत: १५ मिनिटे पावसाचा शिडकावा सुरू होता. ...

Sprinkle rain in the area including Nandurbar | नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा

नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा

नंदुरबार : नंदुरबारसह परिसरात रविवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाचा हलकासा शिडकावा झाला. साधारणत: १५ मिनिटे पावसाचा शिडकावा सुरू होता. यामुळे फारसे नुकसान झाले नाही. दरम्यान, दुपारी मात्र तापमान वाढून ते ४० अंशांपर्यंत गेले होते. त्यामुळे उन्हाचा पारा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते.

रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून ढगांचा गडगडाट सुरू होता. सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता, तर काही ठिकाणी अगदीच तुरळक पाऊस झाला. यामुळे शेतीमालाचे किंवा इतर फारसे नुकसान झाले नाही. सकाळी १० वाजेपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा वाढून तो ४० अंशांपर्यंत गेला होता. शिवाय वातावरणात आद्रता वाढल्याने उकाड्याचेही प्रमाण वाढले होते.

Web Title: Sprinkle rain in the area including Nandurbar