म्हसावद गावात औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:20 IST2020-03-27T13:20:17+5:302020-03-27T13:20:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावात ग्रामपंचायतीमार्फत औषधाची फवारणी करण्यात आली. ग्रामीण ...

Spray the drug in Mhasavad village | म्हसावद गावात औषध फवारणी

म्हसावद गावात औषध फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावात ग्रामपंचायतीमार्फत औषधाची फवारणी करण्यात आली.
ग्रामीण भागात कोरोनाविषयी गंभीरता नसून काम नसतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. शरीर स्पर्श नसला तरी मोठ्या प्रमाणात वस्तू स्पर्श होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत गंभीरता घेऊन पूर्ण गावात औषधी फवारणी करण्यात आली. कानाकोपऱ्यात, ओट्यांवर, उभ्या असलेल्या वाहनांवर औषधी फवावरणी करण्यात आली. या वेळी सरपंच आक्काबाई ठाकरे, उपसरपंच चिंतामण लांडगे, माजी उपसरपंच अंबालाल पाटील, जीवन शिंपी, योगेश पाटील, महेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.ए. ब्राम्हणे यांनी सोशियल डिस्टन्सबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Spray the drug in Mhasavad village