शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरांमध्ये नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

नंदुरबार : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनानिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत’ने आयोजित रक्तदान शिबिरात नोंदणीसाठी ...

नंदुरबार : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनानिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत’ने आयोजित रक्तदान शिबिरात नोंदणीसाठी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी नंदुरबार व बामखेडा, ता.शहादा येथे शिबिरांना सुरुवात होत आहे.

कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रक्तदान शिबिरे व सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा आल्याने राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही त्याचा मोठा फटका बसला असून सद्य:स्थितीत केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात २ जुलै ते३० जुलै दरम्यान विविध ठिकाणी सुमारे २० शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात नंदुरबार व बामखेडा येथून होत आहे. नंदुरबार येथे लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून या शिबिराला सुरुवात होईल. यावेळी खासदार डॅा.हीना गावीत व आमदार डॅा.विजयकुमार गावीत हे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जनकल्याण रक्तसंस्था व नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तसंस्थांचे सहकार्य लाभणार आहे. या शिबिरासाठी विविध संघटनांचाही सहभाग लाभणार आहे.

बामखेडा, ता.शहादा येथील विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाच्या सहकार्याने शिबिर होत असून त्यासाठी नवजीवन रक्त संस्थेचे सहकार्य लाभले आहे. येथील एकता चौकात सकाळी आठ वाजता शिबिराला सुरुवात होईल. यावेळी सरपंच मनोज चौधरी व पोलीस पाटील योगेश चौधरी उपस्थित राहणार आहेत.

नंदुरबार व बामखेडा या दोन्ही ठिकाणी रक्तदान करण्यासाठी दात्यांनी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या शिबिरात जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी होणार आहेत. त्यात नवनिर्माण संस्था, नंदनगरी रोटरी क्लब ऑफ नंदुरबार, लायन्स क्लब ऑफ नंदुरबार, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षक परिषद नंदुरबार तसेच एनसीसीचे विद्यार्थी, वंचित बहुजन आघाडी आणि विविध शहर व ग्रामलेवा पाटीदार ग्लोबल मंडळ अर्थात व्हीएसजीजीएम या संस्थांसह विविध संघटनांचा सहभाग राहणार आहे. हे शिबिरे दोन जुलैपासून तर ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागासह नवापूर, तळोदा आणि शहादा या शहरातही रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.