शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी विशेष ट्रेन रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सलग दुसºया दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलग दुसºया दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे १,२१० आणि पुर्णिया येथे १,२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.रेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन व्यक्तीत विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहºयावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते.पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले. दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत ४,५१४ नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते. जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.सर्व मुलांची आणि मजूरांची तपासणी केली आहे. प्रवाशांची माहिती आणि आवश्यक प्रमाणपत्रे बिहार प्रशासनाला पाठविण्यात आली आहेत. सर्व प्रवासी सुखरूप गावाकडे जात आहेत. यासाठी विविध यंत्रणांनी यासाठी चांगला समन्वय साधला. बिहारचे स्थलांतरीत गावाकडे गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे मोठे काम आहे. यात समन्वयाचे काम महत्वाचे आहे असल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत व अविशांत पंडा यांनी सांगितले.