शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाची प्रशस्त इमारत हस्तांतर लाईट फिटिंगअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

तळोदा न्यायालयाच्या इमारतीसाठी शासनाने गेल्या अडीच वर्षांपूर्वी साधारण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया पार ...

तळोदा न्यायालयाच्या इमारतीसाठी शासनाने गेल्या अडीच वर्षांपूर्वी साधारण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर दोन वर्षांपासून संबंधित ठेकेदाराने युद्धपातळीवर काम करून पूर्ण केले आहे. या प्रशस्त इमारतीमुळे तळोदा न्यायालयास सुसज्ज अशी वास्तू लाभली आहे. साधारण ४० ते ५० हजार स्क्वेअर फूट अशा मोठ्या जागेवर उभारण्यात आलेल्या या इमारतीत न्यायालयाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साहजिकच इमारतीमुळे तळोद्याच्या सौंदर्यातदेखील एकप्रकारे भर पडली आहे. तथापि आता इमारतीमध्ये लाईट फिटिंगची उणीव राहिली आहे. कारण त्याच्या अभावी इमारतीचे हस्तांतरण करता येत नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. वास्तविक शासनाच्या धुळे येथील वीज विभागाकडे येथील यंत्रणेने सहा महिन्यांपूर्वीच लाईट फिटिंगसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, अजूनही संबंधित यंत्रणेने फिटिंगचे काम हाती घेतलेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता गेल्या आठवड्यात तेथील अधिकारी, कर्मचारी आले होते. इमारतीची पाहणीदेखील करून गेले आहेत. त्याचबरोबर मोजमाप केल्याचेही सांगण्यात आले, असे असले तरी इमारतीची न्यायालयास तातडीने निकड असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन लाईट फिटींगचे कामे हाती घेऊन युद्धपातळीवर पूर्ण करून हस्तांतर करावे, अशी मागणी आहे.

जुन्या कुटिर रुग्णालयात सुरू आहे कामकाज

येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयाचे कामकाज शासनाच्या आरोग्य विभागाचे जुन्या कुटिर रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे. या इमारतीत कामकाजासाठी पुरेशी जागा नसली तरी न्यायालयाला नाईलाजास्तव अनेक अडचणींचा सामना करत जसे, तसे काम करावे लागत आहे. त्यामुळे केव्हा इमारत आपल्या हाती मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. याशिवाय सोयीसुविधांचीदेखील कमतरता आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून इमारतीच्या उर्वरीत कामास गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ लाईट फिटिंगचे काम शिल्लक राहिले आहे. त्याबाबतही संबंधित विभागाशी पाठपुरावा केला आहे. त्यांनी काम हाती घेण्यासाठी इमारतीची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच कामास सुरूवात होईल.

- पी. जी. जगताप, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, तळोदा.