शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लागताच भरारी पथके होणार सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीवर अधिकधीक भर देण्यात यावा. निवडणूक जाहीर होताच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीवर अधिकधीक भर देण्यात यावा. निवडणूक जाहीर होताच भरारी पथकांची नियुक्ती करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका:यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. डॉ.भारूड म्हणाले, मतदारांच्यादृष्टीने निवडणूक प्रक्रीया अधिकाधीक सुलभ करण्याकडे लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. मतदान केंद्रस्तरापयर्ंतचा सुक्ष्म आराखडा तयार करावा. मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून लोकसभा निवडणूकीत कमी मतदान झालेल्या केंद्रावर अधिकाधीक मतदान होईल यासाठी विशेष प्रय} करावे. मतदानासाठी आवश्यक पूर्वतयारी वेळेत पुर्ण करावी. त्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यात यावा. मतदान केद्रांना भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घ्यावी. निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे आणि शांततेच्या वातावरणात पूर्ण होईल आणि निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. दिलीप जगदाळे यांनी आदर्श  आचारसंहिता अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. आचारसंहितेचे कठोरपणे पालन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा व आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारींची त्वरीत दखल घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी गोगटे व खांदे यांनी निवडणूक प्रक्रीयेसंदर्भात मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीसाठी शहादा विधानसभा मतदार संघात चार तर नंदुरबार येथे एक सहायक मतदान केंद्रासाठी तर नवापूर पाच व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तीन मतदान केंद्रांच्या जागा बदलाबाबत निवडणुक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.    

निवडणूक कर्मचा:यांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्यात यावे. उमेदवारांचा निवडणूक खचार्बाबत काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. त्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यावर त्वरीत भरारी पथकांची नियुक्ती करावी. 1950 या     क्रमांकावर येणा:या तक्रारींचे निराकरण करावे. निवडणुकीसाठीचा वाहतूक आराखडा त्वरीत तयार करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले.