शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सोमावला बँक शाखा एक अन् गर्दी होतेय थेट २३ गावच्या खातेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

सोमवल : तळोदा तालुक्यातील सोमावल येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेबाहेर सोमवारपासून २३ गावांमधील खातेदार गर्दी करीत आहेत. यातून बँकेबाहेर ...

सोमवल : तळोदा तालुक्यातील सोमावल येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेबाहेर सोमवारपासून २३ गावांमधील खातेदार गर्दी करीत आहेत. यातून बँकेबाहेर अक्षरश झुंबड उडत आहे. यातून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जनजीवन प्रभावित झाले आहे. यातून अनेकांना कुटुंबाच्या गरजा भागविणे मुश्कील झाले आहे. यावर मात करण्यासाठी बँकेत विविध लाभाच्या योजनांचे मिळणारे अनुदान या नागरिकांना साहाय्यकारी ठरत आहे. हे अनुदान अल्प असले तरी गरजा भागत असल्याने ती रक्कम बँकेतून काढण्यासाठी गोरगरीब बँकांकडे धाव घेत आहेत. शासनाने लाॅकडाऊन काळात मदत म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे लाभार्थींची मंजूर रक्कम बँक खात्यात टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यातून सध्या बँकांमध्ये गर्दी होत आहे. सोमवारपासून बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने सध्या या बँकेच्या शाखेत गर्दी मावत नसल्याचे दिसून आले. पैसे खात्यात आले किंवा कसे याची माहिती नसल्याने अनेक जण केवळ बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत. याची चाैकशी करण्यासाठी आलेे होते. या खातेदारांच्या मोबाइलवर कोणताही संदेश येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर काहींना वाचता येत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे. यातून बँकेबाहेर तोबा गर्दी होत असल्याचे समोर आले आहे.

यावेळी वयोवृद्ध महिला व पुरुष येथे हजेरी लावत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. दरम्यान, खातेदारांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या मिनीबँकांमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने बँकेत गर्दी आहे. याव मात करण्यासाठी बँक प्रशासनाने काही दिवसांसाठी प्रत्येक गावाला वार ठरवून रक्कम अदा करण्याची शक्कल लढवली आहे; परंतु यानंतरही दुसऱ्या गावातील लोक बँकेत येत असल्याचे दिसून आले आहे. बहुतेक लाभार्थींनी योजनेची रक्कम म्हणून शासनातर्फे देण्यात येणारा लाभ जेमतेम दोन हजारांपर्यंत असून बँकेतील गर्दीमुळे वेळप्रसंगी तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागतात. यामुळे येण्या-जाण्याचा वाहन खर्च करावा लागत असल्याचे सांगितले.

तळोदा तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कमी आहे. तळोदा शहर वगळता प्रतापपूर, बोरद आणि सोमावल याठिकाणी राष्ट्रीयकृत बँका आहेत. यामुळे या शाखांमध्ये एक लाखांपेक्षा अधिक खातेदार असल्याने बोजा वाढला आहे.

ही आहेत २३ गावे

तळोदा ताुलक्यातील सोमावल येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आसपासच्या २३ गावांमधील नागरिकांची खाती आहेत. यात झिरी, पाठडी, बियामाळ, पिंपरपाडा, सोरापाडा, शिर्वे, सोमावल बुद्रुक, सोमावल खुर्द, नळगव्हाण, गव्हाणीपाडा, ढेकाठी, वाल्हेरी, एकधड, सोजरबार, नर्मदानगर, रतनपाडा, उमरकुवा, काकलपूर, राणापूर, खुशगव्हाण, बेलीपाडा, लोभाणी व बुधावली या गावांतील खातेदारांचा समावेश आहे. येथील खातेदार आठवड्यातील चार दिवस तरी बँकेत येतात.