शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणीवेतून शिक्षकांच्या गटाची मुलांच्या शिकण्यासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता काही शिक्षणप्रेमींनी मुलांच्या ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता काही शिक्षणप्रेमींनी मुलांच्या शिकण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम शोधून काढला व त्या उपक्रमाची अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुलांच्या शिकण्यासाठीही सुरुवात केलेली आहे. या आवाहनाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे व गल्ली-चौकातील मुलांचे शिकणे व खेळणे प्रभावी होण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

‘सामाजिक देणं’ या भावनेने दुर्गम भागात मुलांसाठी काहीतरी ठोस करावे या विचाराने समविचारी गटातील धीरज खैरनार, संदीप पाटील व ललिता भामरे यांनी काकडदा, ता.धडगाव येथील रमेश मोरे यांच्या मदतीने गावातील मुले ज्या ज्या ठिकाणी खेळण्यासाठी, गप्पांसाठी जमतात अशा चार ठिकाणांची निश्चिती केली. या चार ठिकाणांसाठी गावातील जबाबदार व्यक्तींनी परवानगी दिली आणि रंगकामास सुरुवात झाली. मुले स्वतः शिकू शकतील अशा गोष्टी रंगकामातून भिंतींवर साकारल्या गेल्या. यात भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाच्या प्रारंभिक शिक्षणापासून चौथ्या वर्गाच्या स्तरापर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. यातून मुलेच एकमेकांच्या मदतीने शिकू शकतील असा आशय भिंतींवर आहे.

इतकेच न होता ते शिकणे कसे होईल? यासाठी मुलांसमवेत या गटाने गावाच्या शाळेचे शिक्षक, पालक व मुले यांच्या सोबत त्या गोष्टी कशा वापराव्यात याबाबत प्रत्यक्ष मुलांच्या सहभागाने समजावले. मुलांना मदत करण्यासाठी या चार ठिकाणी गावातील निवडक तरुण व शिक्षक यांनी मदतीची जबाबदारी स्वीकारली आहे.

या संपूर्ण प्रकियेत शिक्षकांच्या या गटास काकडदा येथील शिक्षणप्रेमी आमशा पाडवी, पोलीस पाटील गुंजाऱ्या पाडवी, रमेश मोरे, केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे आणि शाळेतील शिक्षक प्रवीण भामरे, संजीव धनगर व सुभाष पावरा यांचे सहकार्य लाभले.

मुलांच्या शिक्षणात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी शिवदास पाडवी, किसन पाडवी, चंद्रसिंग पावरा व शिवानी पाडवी अशा पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभत आहे आणि पुढेदेखील मुलांच्या शिक्षणाचे हे काम सगळ्यांमार्फत सुरू राहणार आहे.