शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणिवेतून शिक्षकांच्या गटाची मुलांच्या शिकण्यासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

‘सामाजिक देणे’ या भावनेने दुर्गम भागात मुलांसाठी काहीतरी ठोस करावे या विचाराने समविचारी गटातील धीरज खैरनार, संदीप पाटील ...

‘सामाजिक देणे’ या भावनेने दुर्गम भागात मुलांसाठी काहीतरी ठोस करावे या विचाराने समविचारी गटातील धीरज खैरनार, संदीप पाटील व ललिता भामरे यांनी काकडदा, ता. धडगाव येथील रमेश मोरे यांच्या मदतीने गावातील मुले ज्या ज्या ठिकाणी खेळण्यासाठी, गप्पांसाठी जमतात अशा ४ ठिकाणांची निश्चिती केली. या ४ ठिकाणांसाठी गावातील जबाबदार व्यक्तींनी परवानगी दिली आणि रंगकामास सुरुवात झाली. मुले स्वतः शिकू शकतील अशा गोष्टी रंगकामातून भिंतींवर साकारल्या गेल्या. यात भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाच्या प्रारंभिक शिक्षणापासून चौथ्या वर्गाच्या स्तरापर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. यातून मुलेच एकमेकांच्या मदतीने शिकू शकतील, असा आशय भिंतींवर आहे.

इतकेच न होता ते शिकणे कसे होईल? यासाठी मुलांसमवेत या गटाने गावाच्या शाळेचे शिक्षक, पालक व मुले यांच्या सोबत त्या गोष्टी कशा वापराव्यात याबाबत प्रत्यक्ष मुलांच्या सहभागाने समजावले. मुलांना मदत करण्यासाठी या चार ठिकाणी गावातील निवडक तरुण व शिक्षक यांनी मदतीची जबाबदारी स्वीकारली आहे.

या संपूर्ण प्रकियेत शिक्षकांच्या या गटास काकडदा येथील शिक्षणप्रेमी आमशा पाडवी, पोलीस पाटील गुंजाऱ्या पाडवी, रमेश मोरे, केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे आणि शाळेतील शिक्षक प्रवीण भामरे, संजीव धनगर व सुभाष पावरा यांचे सहकार्य लाभले.

मुलांच्या शिकण्यात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी शिवदास पाडवी, किसन पाडवी, चंद्रसिंग पावरा व शिवानी पाडवी, अशा पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभत आहे आणि पुढे देखील मुलांच्या शिकण्याचे हे काम या सगळ्यांमार्फत सुरू राहणार आहे.