शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सापाला पकडून केली जनजागृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला जीवदान तर दिलेच त्यासोबत विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीही घालवली.कलसाडी शाळेला चारही बाजूंनी संरक्षण भिंत आहे. तरीही १० ते १५ दिवसांपासून एक ‘पाणदिवळ’ जातीचा चार-साडेचार फुटाचा साप शाळेच्या परिसरात दिसायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा साप १५ दिवसात तीन ते चारवेळेस दिसला आणि लगेच कुठेतरी लपून बसायचा. शनिवारी हा साप पुन्हा शाळेच्या मागच्या बाजूला विद्यार्थ्यांना दिसला. मुख्याध्यापक रजेवर असल्याने विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका स्नेहल सर्जेराव गुगळे यांना साप निघाल्याचे सांगितले. गुगळे यांनी तात्काळ स्वत: सापाच्या दिशेने जात मीना पाटील व निर्मला सामुद्रे यांनाही बोलावले. या सापावर आता आपण व्यवस्थित लक्ष ठेवू आणि सर्पमित्रांच्या सहाय्याने कोणत्याही परिस्थितीत आपण याला आज जीवंत पकडू व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कोणत्याही परिस्थितीत घालवूच, असा या महिला शिक्षिकांनी निश्चत केला. याआधीही दोनवेळा त्या सापाला जीवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता पण तो फटीत घुसून जायचा आणि कुठेतरी लपून बसायचा. स्नेहल गुगळे यांनी याआधी सर्पमित्र राजेश ठोंबरे यांच्याकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. परंतु आपले १० महिन्याचे लहान बाळ सोबत असल्याने त्यांनी यावेळेस स्वत: साप न पकडता त्यांच्या संपर्कातील शहादा येथील सर्पमित्र राहुल कोळी यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना कलसाडी जि.प. शाळेत बोलावले. शहाद्याहून कलसाडीला सर्पमित्र येईपर्यंत जवळपास २० ते २५ मिनिटे या महिला शिक्षिका सापावर लक्ष ठेवूनच होत्या. सर्पमित्र आल्यावर काही वेळातच सापाला पकडून त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्नेहल गुगळे यांनीही स्वत: साप हाताळत तो पाणदिवड जातीचा बिनविषारी परंतु अतिशय चपळ व रागीट साप असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्याला कुठेही व कधीही साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना फोन करून बोलवावे मग ते साप पकडून पुढे पुन्हा एखाद्या शेतात सोडून देतात. त्याला स्पर्श झाल्याशिवाय किंवा आपण त्रास दिल्याशिवाय तो आपल्याला काहीही करत नाही, अशी माहिती मीना पाटील यांनी दिली. निर्मला सामुद्रे यांनीही साप हा शेतकऱ्याचा मित्र असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. कोकणी, कलाल सर व गांगुर्डे यांनी साप पकडण्याची मोहीम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. सापाबद्दलची सर्व माहिती जाणून घेतल्यावर हा साप एक किलोमीटर अंतरावरील शेतातील पाण्यात सोडून देण्यात आला. महिला शिक्षिकांच्या या धाडसाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे.