शनिमांडळ येथील बंद घर फोडून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:31 IST2019-12-19T11:31:00+5:302019-12-19T11:31:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथे बंद घर फोडून दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़ ...

Smashing off a closed house in Saturn, looted jewelry | शनिमांडळ येथील बंद घर फोडून दागिने लंपास

शनिमांडळ येथील बंद घर फोडून दागिने लंपास


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथे बंद घर फोडून दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़ याच दरम्यान या भागात सात ते आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे़
शनिमांडळ येथील शिवाजी रामचंद्र पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे घरात प्रवेश केला होता़ घरातील बंद कपाट फोडून आतील ६३ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले़ सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवाजी पाटील यांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत शिवाजी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत़ शनिमांडळ येथे सोमवारी मध्यरात्र ते मंगळवार पहाटे सहा ते सात ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकार घडले होते़ शनिमांडळ गावातील ज्वेलर्सचे दुकान फोडताना सहा चोरटे सिसीटीव्हीत कैद झाले होते़ या प्रकाराने परिसरात भिती निर्माण झाली आहे़

Web Title: Smashing off a closed house in Saturn, looted jewelry