पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST2021-05-08T04:32:12+5:302021-05-08T04:32:12+5:30

नंदुरबार : कोरोनाचा घरीच इलाज करणाऱ्या अर्थात होम आयसोलेशन रुग्णांसाठी तसेच संस्थात्मक आयसोलेशन असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन वाढविण्याकरिता विविधी थेअरपींचा ...

Sleep well, increase oxygen in the blood | पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा

पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा

नंदुरबार : कोरोनाचा घरीच इलाज करणाऱ्या अर्थात होम आयसोलेशन रुग्णांसाठी तसेच संस्थात्मक आयसोलेशन असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन वाढविण्याकरिता विविधी थेअरपींचा सध्या वापर केला जात आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने फुगे फुगविण्याची थेअरपी सुरू केली, तिला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय चांगला रिझल्टही मिळाला आहे. याबाबत विविध डॅाक्टरांचे विविध मत आहेत.

कोरोना रुग्णांच्या शरीररातील ऑक्सिजन कमी झाल्यास त्यांना ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी किंवा ती नियमित करण्यासाठी पालथे झोपण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास फुफ्फुसावर त्याचा परिणाम होऊन ते अधिक वेगाने क्रियाशील होते. परिणामी ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी मात्र काही बाबींचे पथ्य पाळावे लागते. शिवाय डॅाक्टरांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनानेच या थेअरपीचा उपयोग करणे आवश्यक आहे.

Web Title: Sleep well, increase oxygen in the blood