शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात वेगवेगळ्या दोन अपघातात सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 13:08 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी/नवापूर :  विसरवाडी- नवापूर तालुक्यातील भांगरपाडा ते तारपाडा रस्त्या दरम्यान भरधाव वेगात जाणाऱ्या दोन मोटर सायकल ...

 लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी/नवापूर :  विसरवाडी- नवापूर तालुक्यातील भांगरपाडा ते तारपाडा रस्त्या दरम्यान भरधाव वेगात जाणाऱ्या दोन मोटर सायकल यांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. तालुक्यातील भांगारपाडा ते तारपाडा दरम्यान गुरुदास कृष्णा वसावे (२२) व रितेश बापू गावित (२०) दोघेही राहणार तारपाडा, हे त्यांची मोटरसायकल (क्रमांक एम एच ३९-  ८७४४) ने विसरवाडी कडे येत  होते. याच वेळी लालसिंग सिंगा वसावे छगन यशु वळवी  (२८), व तानाजी गोरजी वसावे (३२) तिघे राहणार बंधारे हे त्यांच्या नव्याने घेतलेली मोटर सायकलने तारपाडा कडे भरधाव वेगाने जात असताना दोन्ही मोटर सायकल समोरासमोर धडकल्या. या अपघातात हे पाच जण जखमी झाले. त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात  रुग्णवाहिका ने तात्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व डॉ. वटसिंग पावरा व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार केले. पैकी गुरुदास कृष्णा वसावे व लालसिंग सिंगा वसावे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्वरित नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तानाजी गोरजी वसावे यास किरकोळ दुखापत झाल्याने तो रुग्णालयात आलाच नाही. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड तात्काळ रुग्णालयात दाखल झाले त्यांनी जखमींची विचारपूस केली.तर दुसरीकडे धुळे-सुरत महामार्गावरील चिंचपाड्यात मोटरसायकलीचा अपघात झाला यात दोन युवक जखमी झाले त्यांना उपचारार्थ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात कपिल मी-या गावित (१८) राहणार बर्डीपाडा विष्णू प्रतापसिंह गावित (२०) रा. तिळासर हे दोन्ही युवक जखमी झाले आहे. त्यांना जबर दुखापती झाल्या असून ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.नवापूर तालुक्यांमध्ये भरधाव वेगाने मोटरसायकल चालवणे, स्पर्धा लावणे या घटना वाढू लागल्याने अपघात होऊन तरूण मंडळी जखमी होत आहे.