शहादा येथे रॅपिड अँटिजन चाचणीसाठी सहा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:22+5:302021-03-17T04:31:22+5:30

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग ...

Six centers for rapid antigen testing at Shahada | शहादा येथे रॅपिड अँटिजन चाचणीसाठी सहा केंद्र

शहादा येथे रॅपिड अँटिजन चाचणीसाठी सहा केंद्र

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी शहरातील अनेक भागांत रॅपिड अँटिजन तपासणी केंद्रे उभारणी करण्यासाठी नियोजन बैठका घेऊन याबाबत नागरिकांना संयम आणि शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील व्यापारी, कामगार, विक्रेते व दुकानदारांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासाठी शहरात शासकीय विश्रामगृह, सप्तशृंगी माता मंदिर, टॅक्सी स्टँड, काझी चौक, नगरपालिका, मिशन हायस्कूल आदी सहा ठिकाणी वैद्यकीय पथके कार्यान्वित करून त्यांच्यामार्फत चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी सर्वानी रॅपिड अँटिजन चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मिशन हायस्कूल परिसर, काझी चौक या परिसरात स्वतः फिरून व्यावसायिकांना रॅपिड अँटिजन चाचणी करण्याचे आवाहन करीत नागरिकांना नमुने देण्यासाठी केंद्रावर पाठविले.

Web Title: Six centers for rapid antigen testing at Shahada