शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणानेच ‘बाप्पा’ला दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव सुरू आहे़ यात बुधवारी पाचव्या दिवशी जिल्ह्यातील विविध भागात घरगुती ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव सुरू आहे़ यात बुधवारी पाचव्या दिवशी जिल्ह्यातील विविध भागात घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या बाप्पाला साधेपणाने निरोप देण्यात आला़ शहादा तालुक्यातील बहुतांश मंडळांनी पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलाव मूर्ती विसर्जित केल्या़
शहादा
जिल्हा प्रशासन विभागाकडून दिलेल्या आदेशानुसार शहादा शहरातील घरगुती बाप्पाचे विसर्जन नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात करण्यात आले़ पालिका मुख्य इमारतीबाहेर शहरातील गणेश मूर्तींसाठी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ याठिकाणी दिवसभर संकलित १८५ गणेशमूर्ती नियुक्त कर्मचाऱ्यांकडून विधिवत प्रेस मारूती परिसरातील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले़ तलावांच्या परिसरात शहादा पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ कोरोनामुळे शहादा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता़ यांतर्गत विसर्जनाच्या आजच्या पहिल्या टप्प्यात साधेपणाने उत्सव साजरा करणाºया सुमारे १० मंडळांकडून मूर्ती विसर्जित करण्यात आली़ सकाळपासून शहरात नागरिक विसर्जन करताना दिसून येत होते़ तलावांच्या परिसरात पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते़ मंडळांनी अत्यंत साधेपणाने दोन कार्यकर्त्यांसह मूर्तीचे विसर्जन केले़ नागरिकांनी पुढच्या टप्प्यातही पालिकेच्या संकलन केंद्रात मूर्ती आणून द्याव्या असे आवाहन पालिका मुख्याधिकारी डॉ़ राहुल वाघ यांनी केले़
नवापूर
नवापूर शहर आणि तालुक्यात यंदा ६३ सार्वजनिक मंडळांकडून मूर्ती स्थापना करण्यात आली आहे़ यातील १८ मंडळांनी बुधवारी बाप्पाला निरोप दिला़ यात सार्वजनिक स्तरावरील सहा मंडळ, खाजगी स्तरावर दोन या सह एक गाव एक गणपती धर्तीवरील दहा अशा १८ मंडळांकडून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले़ शहरात पालिकेने तयार केलेले कृत्रिम तलाव, रंगावली पात्र आणि घरी बादलीत काहींनी बाप्पाचे विसर्जन केले़ नवापूर शहरात सातव्या दिवशी ग्रामीण भागातील चार, शहरातील सार्वजनिक स्तरावरील ११ व खाजगी स्तरावरील चार मंडळांकडून विसर्जन होणार असून अनंत चतुदर्शीला शहरातील एकूण २६ मंडळांकडून निरोप देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़


तळोदा तालुक्यातील बोरद येथील सर्वच्या सर्व पाच सार्वजनिक गणेशमंडळांनी पाचव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले़ गावातील युवकांनी एकाच वाहनात सर्वच्या सर्व गणेश मूर्ती ठेवून साधेपणाने बाप्पाचे विसर्जन केले़ दरम्यान बोरद येथील १०३ वर्षे वय असलेले सरदार पहाडसिंग राजपूत यांना कोरोनातील गणेशोत्सवाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, १०० वर्षांपूर्वी ‘पटकी’ नावाचा आजार पसरला होता़ या महामारीमुळे लोक पटापटा मरत होती़ त्याहीवेळी गणरायाची साध्या पद्धतीने स्थापन करुन विसर्जित करण्यात आले होते़ तेव्हाही गुलालाची उधळण न करता साधेपणाने गुलाल न उधळता आणि वाद्य न लावता हा उत्सव झाला होता़ आजही तसेच घडल्याचे राजपूत म्हणाले़