तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:35 PM2020-02-20T12:35:42+5:302020-02-20T12:35:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ६३ शासकीय तसेच विनाअनुदानित आश्रमशाळा आणि १७ वसतीगृहात शिक्षण ...

SickleCell inspection of 3,000 students in Ashram schools under Taloda project | तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी

तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ६३ शासकीय तसेच विनाअनुदानित आश्रमशाळा आणि १७ वसतीगृहात शिक्षण घेत असलेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यामुळे सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांची निश्चित संख्या समोर येऊन उपचार शक्य होणार आहेत़
सातपुड्याच्या दुर्गम भागासह तळोदा तालुक्याच्या विविध भागात लहान बालकांमध्ये सिकलसेलचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढीस लागत आहे़ यावर पर्याय म्हणून त्यांच्या तपासण्या करुन नियमित औषधी घेणे गरजेचे आहे़ परंतू आश्रमशाळांमध्ये निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शक्य होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत़ काही विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ यातून मार्ग काढत प्रकल्प कार्यालयाने ३० हजार ५४१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी नुकतीच प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांच्या यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, अक्कलकुवा तालुका आरोग्याधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, धडगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ़ दिनेश बढे, राष्ट्रीय बालस्वास्थ वैद्यकीय अधिकारी डॉ़ वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी सुनील लोखंडे, परेश चावडा, माझगाव डॉकचे सीएसआर प्रबंधक रोहित पंड्या, जिल्हा सिकलसेल समन्वयक उमेश शिंदे आदी उपस्थित होते़ या बैठकीत ४२ शासकीय आश्रमशाळांमधील १८ हजार १ विद्यार्थी, २१ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १०१ विद्यार्थी व १७ शासकीय वसतीगृहात शिक्षण घेणारे १ हजार ५५० विद्यार्थी यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाधिकारी पांडा यांनी दिली़ माझगाव डॉक व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली़
दरम्यान एकीकडे तपासणी होणार असल्याने दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया तळोदा तालुक्यातील सिकलसेलग्रस्त विद्यार्थिनींना परत पाठवण्याचे प्रकार झाले आहेत़ याकडे तळोदा प्रकल्प कार्यालयाने लक्ष देऊन सिकलसेलग्रस्त विद्यार्थिनींचा शोध घेऊन येथेच व्यवस्था करण्याची मागणी आहे़

Web Title: SickleCell inspection of 3,000 students in Ashram schools under Taloda project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.