श्रॉफच्या विद्यार्थ्यांचा बालपरिषदेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:24+5:302021-05-08T04:31:24+5:30

महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरू असून, त्याचे सातत्य आणि सक्षमीकरण राखण्यासाठी मुलांना तंबाखूमुक्त व आरोग्यदायी वातावरण मिळावे तसेच ...

Shroff's students honored at Bal Parishad | श्रॉफच्या विद्यार्थ्यांचा बालपरिषदेत गौरव

श्रॉफच्या विद्यार्थ्यांचा बालपरिषदेत गौरव

महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरू असून, त्याचे सातत्य आणि सक्षमीकरण राखण्यासाठी मुलांना तंबाखूमुक्त व आरोग्यदायी वातावरण मिळावे तसेच तंबाखू नियंत्रणासंदर्भात आपले विचार, मनातील प्रश्न-उत्तरे, विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी मुलांना स्वतंत्र व्यासपीठ मिळण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन बालपरिषदेच्या आयोजनामागची भूमिका होती. राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त शाळा, तंबाखूमुक्त समाज निर्मितीत प्रशासन, शासन व स्वतःची भूमिका या विषयांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी नंदुरबार येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलमधील सहावीच्या विद्यार्थिनी मृदुला प्रशांत कासार, स्नेहल रवींद्र पाटील, नीलाक्षी मनोज शेलार, कल्याणी बागुल, मिताली विशाल सोमवंशी, शिक्षक प्रशांत बागुल यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल त्यांना सलाम मुंबई फाउण्डेशनच्या वतीने टी-शर्ट, बॅच, प्रशस्तीपत्र व मास्क देऊन गौरविण्यात आले. प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, सलाम मुंबई फाउण्डेशनचे जिल्हा समन्वयक आदेश नदवीकर, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभत आहे.

Web Title: Shroff's students honored at Bal Parishad