शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : संचारबंदीत दुकाने सुरू ठेवण्याबाबत चुकीची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी तळोदा नगरपरिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : संचारबंदीत दुकाने सुरू ठेवण्याबाबत चुकीची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी तळोदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचे कर निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, संचारबंदीत शिथिलता देण्यात आली असताना तळोदा नगरपालिकेकडून ४ मे रोजी चुकीचे पत्रक व रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकावर चुकीची माहिती प्रसारित केली गेल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण प्रशासनाला खुलासा करावा लागला. या प्रकरणाची दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांनी पालिकेचे कर निरीक्षक राजेश पाडवी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राजेश पाडवी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी प्राप्त आदेशानुसार शहरातील नागरिकांना कोरोनासंदर्भात जाहीर आवाहान करण्यात येत आहे. जाहीर आवाहन तयार करण्याच्या सूचनेत बदल करणेकामी पाडवी यांना सूचित केले होते. तरी त्यांनी चुकीचे जाहीर आवाहान तयार केले. पाडवी यांच्याकडून जाहीर आवाहन देताना ‘अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील’ असे चुकीचे नमूद केले. यावरून आपल्याकडून कामाची तत्परता दिसून येत नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.दरम्यान, याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनही तक्रारी प्राप्त होत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल उपविभागीय अधिकारी यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटिसाचा खुलासा २४ तासाच्या आत सादर करावा अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.