शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येणारे युग हे इंटरनेट व विज्ञानाचे युग आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात आपली अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षणासोबत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येणारे युग हे इंटरनेट व विज्ञानाचे युग आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात आपली अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षणासोबत विज्ञानाची जोड अंगीकारणे गरजेचे आहे. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती असावी लागणार असेल तरच तो विज्ञान वैचारिक होऊ शकतो, असे प्रतिपादन शहादा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी शहादा तालुका विज्ञान प्रदर्शन २०१९ च्या बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केले.शहादा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ शहादा पंचायत समिती शिक्षण विभाग व दादासाहेब भगवान शंकर भामरे माध्यमिक विद्यालय कुकडेल शहादा यांच्या विद्यमाने दोन दिवस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप प्रांताधिकारी चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी आनंदराव पाटील होते. या वेळी शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील, सचिव जे.एस. पाटील, शिक्षण विभागाचे सुनिल तावडे, उषा पेंढारकर, विज्ञान प्रदर्शन प्रमुख एम.आर. निकुंभ, दादासाहेब भामरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.यु. ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी आनंदराव पाटील म्हणाले की, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरत असते. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर तो भविष्याच्या वैज्ञानिक होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आपण केलेले उपकरण यापेक्षा आपण त्या उपकरणातून देशाला काय देऊ शकतो याची माहिती देणे हे वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले.शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डी.ए. पाटील यांनी केले. विज्ञान प्रदर्शनासाठी भामरे विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आदिवासी विद्यार्थी गट अशा चार गटात बक्षिसांची विभागणी करण्यात आली. यात माध्यमिक गटात प्रथम महावीर इंग्लिश मीडियम स्कूल शहादाचा हिमांशू योगेश पाटील याच्या फ्युचर ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन, द्वितीय वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील जयेश माणिक पाटोळेच्या वॉटर क्लिनिंग बोट, तृतीय कै.वाय.आर. पाटील माध्यमिक विद्यालय कहाटूळाचा पुरुषोत्तम कैलास अहिरे याचे रॉकेट लाँचर.माध्यमिक गट आदिवासी- कै.दादासाहेब एस.भामरे माध्यमिक विद्यालय शहाद्याचा धनराज सुकलाल पावरा याच्या ऊर्जाबचत तंत्रज्ञान या उपकरणास तर शिक्षकांच्या माध्यमिक गटात प्रथम कोचरा आश्रमशाळेचे मालजी जाण्या गावीत यांच्या मनोरंजनातून विज्ञान संकल्पना, द्वितीय तिखोरा माध्यमिक विद्यालयाचे विजय हिरालाल पाटील यांचा नदीजोड प्रकल्प.प्राथमिक गटात प्रथम सातपुडा विद्यालय लोणखेड्याचा सुरेश विजय पाठक याच्या औद्योगिक विकास यंत्रणा, द्वितीय महावीर इंग्लिश मीडियम स्कूल शहादाचा विश्वेश अनिल पवार याच्या आॅईल रिफायनरी, तृतीय क्रमांक सरस्वती विद्या मंदिर शहादाचा कस्तुरी नंदलाल निझरे याच्या गणितीय जादू उपकरणाने पटकावला.प्राथमिक आदिवासी गटात गुरुवर्य गोविंद श्रीपाद पाटील माध्यमिक विद्यालय परिवारातील दामिनी लोटन माळीच्या टाकाऊ वस्तूपासून प्रोजेक्टर या उपकरणास तर प्राथमिक शिक्षक गटात कोचरा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या रामदास पूना पाटील यांच्या संबोध गणिताच्या उपकरणाने पटकावला. प्रयोगशाळा परिचर गटात कोचरा अनुदानित आश्रमशाळेच्या राहूल वसंत चकणे यांच्या अध्यापन उपयुक्त साहित्याची निवड करण्यात आली.