नंदुरबार पंचायत समितीकडून सात वाहने तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST2021-05-08T04:32:10+5:302021-05-08T04:32:10+5:30

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी, महेश वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. जे. आर. तडवी, सहायक गटविकास अधिकारी लालू ...

Seven vehicles deployed by Nandurbar Panchayat Samiti | नंदुरबार पंचायत समितीकडून सात वाहने तैनात

नंदुरबार पंचायत समितीकडून सात वाहने तैनात

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी, महेश वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. जे. आर. तडवी, सहायक गटविकास अधिकारी लालू पावरा, विस्तार अधिकारी बी. डी. निकुंभे, निकुंभे, आर. डी. पवार यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व वाहन चालक उपस्थित होते. नंदुरबार पंचायत समितीकडून गुरुवारी बैठक घेत लसीकरणाचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी नागरिकांना आरोग्य केंद्रांपर्यंत आणण्यासाठी वाहने नसल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर सात वाहने मंजूर करण्यात आली आहेत. ही वाहने राकसवाडे, ढेकवद, शनीमांडळ, आष्टे, नटावद, लहान शहादे व कोपर्ली या केंद्रांवर नियुक्त करण्यात आली आहेत. ही वाहने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राअंतर्गत गावांना लसीकरण कॅम्प वापरावयाची असल्याच्या सूचना करावयाच्या आहेत. या वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व आवश्यक साहित्य, तसेच लसीकरण ठिकाणी काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बाधितास जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Seven vehicles deployed by Nandurbar Panchayat Samiti