शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरुन आलेल्या मजुरांचे झाडाखाली विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे गावाकडे परतत आहेत. शहादा तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे गावाकडे परतत आहेत. शहादा तालुक्यातील चांदसैली व गोदीपूर येथील मजूर गावी येताच ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी त्यांना घरी जाऊ न देता गावालागतच असलेल्या शेतात झाडाखाली १४ दिवसांसाठी विलगीकरण करुन ठेवत आहेत.शहादा तालुक्यातील शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतात व परजिल्ह्यात गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक मजूर तिकडेच अडकले. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने मजुरांवर मोठे संकट आले. गावी परत येण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन हे मजूर स्वत:च्या गावी येत आहे. शहादा तालुक्यातील चांदसैली येथे आजपर्यंत २० ते २५ मजूर परतले आहेत. त्यात काही मजुरांना त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे सोडण्यात आले. आजच्या घडीला १६ मजूर येथील शेतात झाडाखाली विलगीकरण करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हे मजूर दरवर्षी रोजगारासाठी जातात. विविध गावांमध्ये हे मजूर ऊसतोड करतात. विलगीकरण झालेले हे मजूर कुटुंब त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची, चहा व नाश्त्याची सोय करतात. गावाचे सरपंच हे किराणा सामानाची व्यवस्था करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सुलवाडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. विलगीकरण झालेल्या मजूर कुटुंबांना संपूर्ण गावाचे सहकार्य लाभत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाच्या सुरक्षतेसाठी सहा स्वयंसेवकांची ग्रामसुरक्षा दलाची आणि ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करून त्यामधील स्वयंसेवक आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. विलगीकरण केलेल्या मजुरांची काळजी सरपंच संजय पाडवी हे स्वत:हून घेत असून त्यांना जि.प. सदस्य जवरू पाडवी, पोलीस पाटील राज मुसळदे, ग्रामसेवक गोपाल गिरासे, शांतीलाल साळवे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.