अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह प्रशासक व ग्रामसेवकांना दुसऱ्यांदा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:47+5:302021-02-05T08:08:47+5:30

दोन प्रशासक, दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, एक ग्रामसेवक, दोन ग्रामविस्तार अधिकारी आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांना नोटीस ...

Second notice to Akkalkuwa Gram Panchayat's grandparents, former office bearers, administrators and Gram Sevaks | अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह प्रशासक व ग्रामसेवकांना दुसऱ्यांदा नोटीस

अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह प्रशासक व ग्रामसेवकांना दुसऱ्यांदा नोटीस

दोन प्रशासक, दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, एक ग्रामसेवक, दोन ग्रामविस्तार अधिकारी आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. एकूण चार कोटी ७५ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नोटीस बजावण्याची प्रथम कारवाई नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती. २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर २०२०मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा यांनी चार सदस्यीय समिती नेमून चाैकशी करण्याचे आदेश दिले होते. प्रथम दिलेला ३१ पानी अहवाल अपूर्ण असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा नव्याने आढावा घेण्यास सुरुवात केली होती. १४वा वित्त आयोग आणि पाच टक्के पैसा निधी खर्च केल्याचा योग्य तो हिशोब नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. ग्रामपंचायतीत ई-टेंडरींग न करताच रस्त्यांची व गटारींची कामे दर्शवली गेल्याचे यातून समोर आले होते. शहरातील अनेक भागात प्रत्यक्षात विकासकामे नसतानाही त्या नावाने रकमा काढल्या गेल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून समोर आल्यानंतर नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी पंचायत समितीकडे सर्व ९ जणांच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळालेल्या सर्व ९ जणांना आठ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेकडे खर्च केलेल्या रकमेच्या पुराव्यासह म्हणणे मांडायचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोटीसीला दिलेल्या उत्तरातून गैरव्यवहार झालेल्या चार कोटी ७५ लाख रुपये निधीचा ताळमेळ न बसल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, त्यांनी नोटीस पंचायत समितीकडे पाठवण्यात आल्या असून, दोन ते तीन दिवसात संबंधितांना त्या मिळणार आहेत. नोटीस मिळाल्याच्या आठ दिवसात संबंधितांनी थेट जिल्हा परिषद प्रशासनाकडे म्हणणे मांडायचे असल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Second notice to Akkalkuwa Gram Panchayat's grandparents, former office bearers, administrators and Gram Sevaks