शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यातील शाळांमध्ये बालमेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जनार्थ आदिवासी विकास संस्था, टाटा ट्रस्ट व अस्माई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जनार्थ आदिवासी विकास संस्था, टाटा ट्रस्ट व अस्माई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील 15 आश्रशाळा आणि जि़प़शाळांमध्ये बालमेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होत़े काकडदा, चुलवड, सोन, सुरवाणी, वेली, जमाना, मांडवी बुद्रुक, अक्राणी, राजबर्डी आश्रमशाळा तर  मांडवी खुर्द, धडगाव, कुंडल, बोरीडाबरा, सिसा, सुर्यपुर या 15 जिल्हा परिषद शाळांमध्ये  सुरु असलेल्या बालभवनांमध्ये बुधवारी हे बालमेळावे घेण्यात आले. यात दीड हजार विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, शाळा एके शाळा या नियमित जिवनातून थोडी विश्रांती घेऊन विद्याथ्र्याना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बालमेळावा घेण्यात आला. बालमेळाव्यात नाटीका, आदिवासी समूह नृत्य, अभिनय, गीते, हस्तकला, स्ट्रॉ पासून बनविलेली पिपाणी, कागदापासून पंखा इत्यादी वस्तू बनवून सांस्कृतिक कार्यक्रम पावरी-भिलोरी भाषेमध्ये विद्याथ्र्यानी सादर केल़े मेळाव्याला मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, गावातील पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी उपस्थिती देत विद्याथ्र्याचे कौतूक केल़े 15 गावांमध्ये एकाच दिवशी बालमेळावे घेण्यात आले. कार्यक्रमास जनार्थ आदिवासी विकास संस्थेचे संचालक विक्रम कान्हेरे, समन्वयक शिवाजी घोडराज यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे रमेश मोरे, चामसिंग पावरा, सतू पावरा, ममता तडवी, प्रमिला पावरा, कविता वळवी, मनोहर वळवी, गणपत वळवी, महेंद्र ठाकरे, उत्तम मोरे, भरत गवळे, दिनेश नवेज, रुपसिंग पावरा, दिलीप पावरा, राकेश पावरा, खिलिप वळवी, गणपत वळवी, अनवर वळवी, राकेश साळवे, पर्यवेक्षक अशोक पाडवी, संभाजी पावरा, मनोज राठोड, अनंत पावरा यांनी परिश्रम घेतल़े