शाळा ऑनलाईन मात्र शुल्क आकारणी थेट १०० टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:26+5:302021-06-20T04:21:26+5:30

नंदुरबार : यंदाही कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू होत आहेत. असे असतानाही खासगी शाळांकडून मात्र पूर्ण फी वसूल केली जात ...

School online but the fee is directly 100 percent! | शाळा ऑनलाईन मात्र शुल्क आकारणी थेट १०० टक्के !

शाळा ऑनलाईन मात्र शुल्क आकारणी थेट १०० टक्के !

नंदुरबार : यंदाही कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू होत आहेत. असे असतानाही खासगी शाळांकडून मात्र पूर्ण फी वसूल केली जात आहे. यामुळे पालकवर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे, शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार व इतर बाबींचा खर्च राहत असल्यामुळे फी घ्यावी लागत असल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे. या संदर्भात शिक्षण विभागातर्फे देखील स्पष्ट आदेश नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे.

शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू झाले आहे. शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. खासगी शाळांनी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून गेल्या वर्षी असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला गेला आहे. आता विद्यार्थ्यांच्या व्हॉटस‌्प गृपवरून पालकांकडे फीचा तगादा लावला जात आहे. जर शाळाच सुरू होणार नसल्या तर ऑनलाईन शिक्षणाची एवढी फी का? असा पालकांचा सवाल आहे. तर पगार आणि इतर खर्च भागविण्यासाठी फी घ्यावीच लागणार असून त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे.

खासगी शाळांना शासनाचे कुठलेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फीमधूनच सर्व खर्च भागवावा लागतो. सध्या ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी शिक्षकाचे पगार करणे, इतर शैक्षणिक कामे यांसाठी खर्च लागतो. तो खर्च फीमधूनच करावा लागत असल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी फी कमी करण्यात आली होती. शिवाय फी भरण्यासाठी सवलतही देण्यात आली होती; परंतु अनेक पालकांनी निकाल लागला व दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी मागील फी पूर्ण दिली नाही. आता नवीन शैक्षणिक वर्षाच्या फीची वेळ आली आहे. त्यामुळे मेसेज टाकावे लागतात, फोन करावा लागत असल्याचेही शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

Web Title: School online but the fee is directly 100 percent!