तळोद्याच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:43 IST2021-04-28T14:43:11+5:302021-04-28T14:43:22+5:30

गटविकास  अधिकारी खर्डे या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आजारी होत्या त्यांना सुरुवातीला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या करोना अहवाल देखील पॉसिटीव्ह आला होता.

Savitri Kharde, group development officer of Taloda, died due to corona | तळोद्याच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोनामुळे निधन

तळोद्याच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोनामुळे निधन

 

तळोदा :-  तळोदा येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे (वय ४५) यांचे मंगळवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असताना करोनाने निधन झाले. अशी माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे. एक मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारीच्या निधनाने पंचायत समिती वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
                  गटविकास  अधिकारी खर्डे या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आजारी होत्या त्यांना सुरुवातीला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या करोना अहवाल देखील पॉसिटीव्ह आला होता.तेथे उपचार सुरू असतांना त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तेथे मृत्यू शी झुंज देतांना रात्री अखेरचा श्वास घेतला. खर्डे ह्या तालुक्यातील धवळीविहिर गावाच्या असून २०१९ मध्ये तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या होत्या. आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांशी गोडी गुलाबीने काम करून घेत असत.त्यामुळे घरकुले, व इतर योजनेतील कामांनी वेग घेतला होता. खर्डे ह्या ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ग्रामीण भागाचा जाण होती त्यामुळे शासनाच्या विविध योजना राबवितांना ग्रामीण जनतेशी चांगलीच नाळ जुळली होती. तळोदा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी च्या पदभार स्वीकारण्याच्या आधी त्या कोकणात कार्यरत होत्या.त्यांच्या अश्या अकस्मात मृत्यू ने पं स च्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पाश्चात पती, दोन मुलं, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.

Web Title: Savitri Kharde, group development officer of Taloda, died due to corona