शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा संगणकीकरण डिसेंबरअखेर पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे कामकाज वेगाने सुरू असून या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील कामाचा आढावा उपजिल्हाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे कामकाज वेगाने सुरू असून या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील कामाचा आढावा उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीस नायब तहसिलदार प्रविण बागुल, जिल्ह्यातील महसूल नायब तहसिलदार, प्रत्येक तालुक्यातील चार तलाठी, दोन मंडळ अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी  निकम म्हणाले, हस्तलिखित सातबारा आता बंद झाला असून सातबारा संगणकीकरणामुळे आता तलाठी कार्यालया ऐवजी शासनाच्या संकेतस्थळावर 15 रुपये शुल्क भरुन डिजीटल सहीचा सातबारा उपलब्ध होईल. यासाठी आवश्यक कार्यवाही संबंधित कर्मचारी आणि अधिका:यांनी कालमर्यादेत पुर्ण करावी. त्याबाबत अडचणी आल्यास वरिष्ठ अधिका:यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. येत्या आठ ते दहा दिवसात सर्व नोंदी अद्ययावत करून सातबारा संगणीकरणाचे काम पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण तीन लाख 90 हजार 540 सातबारा संख्या असून आतापयर्ंत तीन लाख 59 हजार 141 सातबा:यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित सातबारा संगणकीकरणाचे 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. आज अखेर 91.96 टक्के संगणकीकरणाचे काम झाले असून 31 डिसेंबर पयर्ंत जिल्ह्यातील शंभर टक्के संगणीकरणाचे काम होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सातबारा संगणीकरणामुळे खातेदाराला घरबसल्या सातबारा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना या कामासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नसल्याने त्यांचा वेळ व खर्च वाचणार असून महसूल कर्मचा:यांनादेखील इतर    कार्यालयीन कामांसाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. तलाठी कार्यालयासोबतच मंडळ अधिकारी स्तरावर ‘फिफो’ ही प्रणाली सुरु करण्यात आली असून त्यामुळे सातबारा व फेरफार नोंदी घेण्याच्या कामात गती येणार आहे.