नंदुरबार जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:49+5:302021-01-23T04:32:49+5:30

नंदुरबार - जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील ३५ व नंदुरबार तालुक्यातील ४१ अशा एकूण ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण ...

Sarpanch reservation draw program announced in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार - जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील ३५ व नंदुरबार तालुक्यातील ४१ अशा एकूण ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २९ जानेवारी रोजी शहादा व नंदुरबार तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ५१९ ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायती अशा एकूण ५९५ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे. हे आरक्षण १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लागू राहणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण जाहीर केले जाणाऱ्या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे.

Web Title: Sarpanch reservation draw program announced in Nandurbar district