शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कलम 411 च्या अतिरेकामुळे सराफ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भादंवि कलम 411 ला सराफा व्यावसायिकांचा विरोध नाही. परंतु त्या कलमाखाली सराफा व्यावसायिकांना होणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भादंवि कलम 411 ला सराफा व्यावसायिकांचा विरोध नाही. परंतु त्या कलमाखाली सराफा व्यावसायिकांना होणारा त्रास देण्याच्या प्रकाराला विरोध असल्याचे प्रतिपादन राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले. नंदुरबार शहर सराफ असोशिएशनतर्फे गुरुवारी एक दिवशीय  जिल्हास्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर सल्लागार संतोष नानकांनी, सहसचिव मुकुंद विसपुते, अजय नाशिककर, विजयकुमार डहाळे, जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ, प्रशांत विसपुते, शहराध्यक्ष सुनील सोनार उपस्थित होते. वर्मा म्हणाले, कलम 411 चा त्रास मोठय़ा प्रमाणात सोनार समाजातील व्यापा:यांना होत आहे. आम्ही कधीही विरोध केला नाही. तो आपल्या संरक्षणासाठी तयार झालेला कायदा आहे. त्यात जामीन होतो त्याला कधीही विरोध करू नका, तुम्ही वाईट वागू नका. सुवर्णकार समाज इमानदारीने व्यवसाय करणारा आहे. कायद्याचे अज्ञान काढून टाका हिमतीने त्याचा सामना करा. कायद्याचा आधार घेऊन तुम्ही काम करा. आज पोलिसांपासून संरक्षण द्या अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. सोनाराला चोर व पोलिस दोघांचाही त्रास होतो आहे. सराफा व्यावसायिक सर्वात जास्त 34 विविध प्रकाराने टॅक्स देत असतो. तेव्हा त्याला कोणते संरक्षण दिले जाते हेही बघितले गेले पाहिजे. सुनील सोनार यांनी सांगितले, आदिवासी जिल्ह्यात वावरताना आपल्याला मोठय़ा शहरापेक्षा वेगळ्या अडचणी निर्माण होतात. स्थानिक अडचणी पण माहिती करून देणे आवश्यक असल्याचे सांगून स्थानिक घडलेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली.  कार्यक्रमात कर सल्लागार नानकांनी यांनी जिएसटी व इतर करांबाबत व्यापा:यांना सविस्तर माहिती दिली . जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ यांनी सांगितले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याचे ऋण फेडायचे आहे ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपला व्यवसाय प्रतिष्ठेचा आहे. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार हा सोनारांशिवाय होत नाही. चाकोरीबद्ध व्यवसायातून बाहेर पडून आपल्यात बदल करणे आवश्यक आहे. नाशिककर यांनी तूच तुज्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे आपण आपल्या शहरात चांगला व्यवसाय करावा असे आवाहन केले. प्रास्ताविक स्वप्नील सोनार, परिचय जगदीश सोनी तर सूत्रसंचालन योगेश सोनार व आभार हर्षल सोनार यांनी मानले.कार्याध्यक्ष जितेंद्र सोनार, उपाध्यक्ष जगदीश सोनी, हिरालाल सोनी ,आनंद सोनार, विनोद सोनार, अल्पेश सोनार, प्रदीप सोनार, स्वप्निल सोनी, विनोद सोनार, नंदकिशोर थोरात, संजय श्रॉफ, पंकज सोनार, संजय सोनार, अजय सोनार, योगेश सोनार आदी उपस्थित होते.

संमेलनानिमित्त जिल्हाभरातील सराफा व्यावसायिक आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून नंदुरबारात आले होते. त्यामुळे नंदुरबार शहरासह शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा येथील सराफा दुकाने दिवसभर बंद होती. परिणामी सराफा बाजारांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. परिणामी    लाखोंची उलाढाल देखील ठप्प झाली होती. सराफा व्यावसायिकांची एकी या निमित्ताने दिसून आल्याचे चित्र होते.