अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना वेतन नियमित सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:05+5:302021-03-17T04:31:05+5:30

नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करून पुढील आदेश पारित करण्याचे आश्वासन मिळाले होते. याबाबत ...

Salary of teachers in minority educational institutions starts regularly | अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना वेतन नियमित सुरू

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना वेतन नियमित सुरू

नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करून पुढील आदेश पारित करण्याचे आश्वासन मिळाले होते. याबाबत नाशिक उपसंचालक नितीन उपासनी यांनी टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन पुढील आदेश पारित होत नाही, तोपर्यंत वेतन स्थगित करू नये, अशा शासन निर्णयाचे परिपत्रक काढल्यामुळे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना न्याय मिळवण्याकरिता नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक नंदुरबार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, महेंद्र फटकाळ, रफिक जहागिरदार, कपूरचंद मराठे, डी‌.डी. साळुंके, फय्याज खान, मनोहर साळुंके या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. सदर मागणीला यश आल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले होते.

Web Title: Salary of teachers in minority educational institutions starts regularly