शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

एकमुखी दत्ताला 56 भोगचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार    आहे. गीता जयंतीनिमित्त पूजाविधी करुन या यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. शुक्रवारी साध्या पद्धतीने  गीता जयंती साजरी करण्यात आली.            शहादा तालुक्यातील  सारंगखेडा यात्रोत्सव यंदा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर रद्द केला असला  तरी दत्त मंदिर संस्थांनतर्फे प्रशासनाच्या नियमावलीचे  पालन करीत  मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.         शुक्रवारी सकाळी सात वाजता प्रथम मंदिरातील गाभाऱ्यातील  महानुभावपंथीय भाविकांनी दत्तप्रभूंच्या मूर्तीला स्नान घालत  ५६ प्रकारची मिठाई, फळे व अन्नपदार्थांचा उपहार  दाखवण्यात आला व विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.दत्तजयंतीच्या आधीच  भाविकांना दर्शनाची ओढकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव नसला तरी दत्तजयंतीच्या आधीच टप्प्या टप्प्याने शासनाच्या नियमांचे पालन करीत भाविक गीता जयंतीपासूनच येण्यास प्रारंभ झाला आहे. अनेक भाविक हे दत्त जयंतीच्या दिवशी नवस फेडण्यासाठी गर्दी करतात. मात्र गर्दी वाढू नये म्हणून सतर्कता दाखवीत शुक्रवारी नवस फेडण्यास प्रारंभ झाला.  त्यात तुलेचे नवस तसेच दालबाटीचा उपहार दाखवून नवस फेडला, अशी माहिती दत्त मंदिर संस्थानचे सचिव भिकन पाटील, चेअरमन   अर्जुन पाटील, व्हा.चेअरमन रवींद्र पाटील यांनी दिल.साखरेची तुलासारंगखेडा येथील एका महिलेला दुर्धर आजार झाला होता. या महिलेवर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सहा महिन्यांनी प्रकृती चांगली झाली.  दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांची दत्तप्रभूंवर श्रद्धा असल्याने त्यांनी नवस मानला होता. शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी या महिलेची साखरेची तुला करून नवस फेडला. या वेळी त्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

अश्वशौकिनांसह व्यापाऱ्यांची झाली निराशासुमारे ४००वर्षांची परंपरा असलेल्या महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या  व एक महिनाभर चालणाऱ्या दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या घोडे बाजारात व  चेतक महोत्सवात देशभरातून विविध जातीचे घोडे दाखल होतात. या घोडेबाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन शेकडो लोकांना त्या काळात रोजगार उपलब्ध होतो. चेतक महोत्सवात विविध प्रकारच्या अश्व स्पर्धा, महिलांसाठी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यात ग्रामीण भागासह शहरी भागातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी त्यांना संधी प्राप्त होते.  परंतु कोरोनामुळे यंदा प्रशासनाने यात्रोत्सव रद्द केल्यामुळे अश्वशौकिनांचा व व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे.