शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य शिक्षणाला व्यावसायिक दर्जा देण्यांत केंद्र शासनाची भुमिका महत्त्वाची - प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाजकार्य शिक्षण परिषद विधेयक २०२१ याविषयाबाबत व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या सोशल वर्क ...

संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाजकार्य शिक्षण परिषद विधेयक २०२१ याविषयाबाबत व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या सोशल वर्क स्टुडन्ट फाऊंडेशन महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक तुषार जाधव यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन ६ मे २०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणेचे प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे, निर्मला निकेल समाजकार्य महाविद्यालय, मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक डॉ. हेलन जोसेफ उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, तळोदाचे प्राचार्य धनंजय माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रचना अडसुळे, सोशल वर्क स्टुडंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार जाधव, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष साजिद शेख उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. अडसुळे असे म्हणाले की, समाजकार्य शिक्षणाला व्यावसायिक दर्जा देण्यात केंद्र शासनाची भुमिका महत्त्वाची आहे. तसेच सद्य:स्थितीत भारतात ५०० पेक्षा अधिक समाजकार्य शैक्षणिक संस्था असून, विविध क्षेत्रात पाच लाखाहून अधिक व्यावसायिक समाजकार्यकर्ते कार्यरत आहेत. जे आपले ज्ञान, मूल्य व कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे योगदान देत आहे. समाजकार्य शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आणि समाजकार्यकर्त्याची व्याख्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय समाजकार्य शिक्षण परिषद विधेयकाची आवश्यकता आहे. या परिसंवादामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून व्यावसायिक समाजकार्यकर्ते, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

या वेळी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, तळोदा प्राचार्य डॉ. धनंजय माळी म्हणाले की, विधेयक अमलात आणण्यासाठी समाजकार्याच्या प्राध्यापक व समाजकार्य शिक्षणाशी निगडित व्यक्तींनी एकत्र यायला हवे. सोशल वर्क स्टुडन्ट फाऊंडेशन महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून विधेयक अमलात आणण्यासाठी खूप चांगल्या पध्दतीने प्रयत्न केले जात आहेत.

परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवम जाधव, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामचंद्र परदेशी, ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष खरात, वर्धा जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाहिद शेख आदींनी प्रयत्न केले.