शहादा पोलिसांचे शहरात पथसंचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:53 PM2020-04-08T12:53:07+5:302020-04-08T12:54:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून, संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मंगळवारी सायंकाळी ...

 Road martyrs of martyr police | शहादा पोलिसांचे शहरात पथसंचालन

शहादा पोलिसांचे शहरात पथसंचालन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून, संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मंगळवारी सायंकाळी शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.
देशात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना सदृश्य रुग्ण दिवसा गणिक वाढत चालले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत असल्या तरी घरात थांबणे यावर सर्वात मोठा उपाय आहे. परंतु अनेक जण हा उपाय पाळत नसल्याने सद्या संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.
१४ एप्रिल पावेतो लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे संचारबंदी शिथील होते का वाढते हे प्रश्नांकित असून, पुढील उपाययोजनांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे शहरात झालेल्या पथसंचलनावरून दिसून आले.
संचारबंदीच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील तसेच वर्दळीच्या परिसरातून पोलिसांनी पथसंचलन केले. पथसंचलनाची सुरूवात जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली. खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी, एकलव्य नगर, जामा मशिद परिसर, सोनार गल्ली, आझाद चौक, गांधी चौक, पिंजार गल्ली, जनता चौक मार्गे काढीत पुन्हा जुन्या तहसील कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.
या पथसंचलनात शहादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. या पथसंचलनात पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नीलेश वाघ, पोसई योगिता पाटील, विक्रांत कचरे, इनामदार, भगवान कोळी आदींनी सहभाग घेतला.

Web Title:  Road martyrs of martyr police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.