शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

ंंआॅनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थी आत्मकेंद्रीत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅनलाईन शिक्षणाचे जेव्हढे फायदे आहेत तेव्हढे तोटे देखील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या काळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आॅनलाईन शिक्षणाचे जेव्हढे फायदे आहेत तेव्हढे तोटे देखील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या काळात हा चांगला पर्याय असला तरी यामुळे बालकांना विविध शाररिक व्याधींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय ते एकलकोंडी होण्याचीही भिती आहे. यावर उपाय म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित योगा, प्राणायामसह विविध खेळात देखील रमवले पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शैक्षणिक वर्ष तर सुरू झाले, परंतु प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे जवळपास ८० टक्के शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय खाजगी क्लासेस चालकांनी देखील आॅनलाईन ट्यूशन सुरू केल्या आहेत. परिणामी आॅनलाईन शाळा आणि ट्यूशन यात विद्यार्थी गुरफटला जात आहे. त्याचे चांगले व वाईट परिणामही दिसून येत आहेत.
शाररिक व्याधींची भिती
आॅनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शाररिक व्याधींचीही भिती व्यक्त केली जात आहे. सतत संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रिनसमोर बसल्यामुळे डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना चष्म्याचा कमी नंबर असेल तो वाढणार व काहींना नव्याने चष्मा लावावा लागणार. डोकेदुखी आणि मायग्रेनचाही त्रास उद्भऊ शकतो. एका ठिकाणी बसून राहण्यामुळे अजिर्ण आणि पोटाचे विकार होऊ शकतात.
योगा, प्राणायाम व खेळणे
शाळेत शिकण्यासोबत मुुलं मित्रांसमवेत खेळणे, बागडण्यात रमतात. त्यामुळे वर्गात बसून राहण्यासह खेळण्यातूनही त्यांचा व्यायाम होतो. घरात बसून तसे होणे शक्य नाही.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना नियमित योगा, प्राणायामसह खेळण्या, बागडण्यासाठी देखील उद्यूक्त करावे. त्यातून त्यांचा शाररिक आणि मानसिक व्यायाम देखील होऊ शकतो. किमान एक तास घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येत विविध विषयांवर चर्चा करावी यातून मुलांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
सध्याचा कोरोनाच्या काळात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय नाही हे जरी खरे असले तरी त्यामुळे होणाऱ्या शाररिक परिणामांचाही विचार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केल्यास आॅनलाईन शिक्षणाचा उद्देश सफल होऊ शकेल असेही मत व्यक्त होत आहे.


संगणक किंवा मोबाईलच्या स्क्रिनकडे एकटक बघू नये. दर तीन ते पाच मिनिटांनी नजर इकडे तिकडे फिरवावी. प्रत्येकाने ब्रेक घेऊनच काम करावे किंवा स्क्रिन समोर बसावे. स्क्रिनचा ब्राईटनेस कमी ठेवावा. सकाळी व सायंकाळी नियमित व्यायाम करणे, खेळणे याला प्राधान्याने वेळ द्यावा. लहान मुलांना स्क्रिनकडे एकटक पहाण्याची सवय नसते. त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी पालकांनी लक्ष घालावे. डोळ्यांचा त्रास, डोकेदुखी, झोन न येणे अशा प्रकारचे त्रास होत असल्यास लागलीच डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. आॅनलाईनला सध्या पर्याय नाही हे देखील तेव्हढेच खरे.
-डॉ.अनिल शहा, नेत्रशल्य विशारद, नंदुरबार.