वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:44+5:302021-04-30T04:38:44+5:30

प्रसंगी सर्वेक्षण शिक्षकांनी त्यांना येणारे अनुभव मांडले. लसीकरणासाठी लोकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली. ...

Review meeting for vaccination at Vanyavihir | वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी आढावा बैठक

वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी आढावा बैठक

प्रसंगी सर्वेक्षण शिक्षकांनी त्यांना येणारे अनुभव मांडले. लसीकरणासाठी लोकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी आर. आर. देसले यांनी लसीकरणाबाबत अपप्रचार होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे सांगून जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांनी लसीकरणानंतर १-२ दिवस अंगदुखी, ताप आल्यास घाबरून जाऊ नये, उलट अशी लक्षणे आल्यावर लस प्रभावी कार्य करीत आहे, गुण दाखवित आहे,आपल्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते आहे,असे समजावून सांगितले. वाण्याविहीर बीटचे केंद्रप्रमुख मोहन बिस्नारीया यांनी लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले. सातपुडा वैभव विद्यालयाचे प्राचार्य दत्ताभाऊ सूर्यवंशी यांनी लसीकरणाची माहिती दिली.

तहसीलदार आर.एम. राठोड यांनी प्रत्येकाने नियुक्त केलेल्या गावात ५० जणांची नोंदणी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करत अंगणवाडी सेविकांचे लसीकरण पूर्ण करण्यासह विविध विषयांवर सूचना केल्या.

बैठकीस वाण्याविहीर ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पाडवी, जिल्हा परिषद सदस्य

जितेंद्र पाडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी एस. ए. चौधरी, अभिजित मोलाणे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ए. के. बिराडे, आरोग्य पर्यवेक्षिका डॉ. ऋषिका वसावे, ग्रामसेवक किशोर शिरसाठ तसेच वाण्याविहीर केंद्रांर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Review meeting for vaccination at Vanyavihir