शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दुसऱ्या दिवशीही लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनातर्फे १५ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी सात ते ...

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनातर्फे १५ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी सात ते दुपारी एक हा कालावधी वगळता लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दुपारी एक वाजेनंतर कडेकोट बंद पाळला. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

प्रशासनातर्फे कारवाई केली जात असली तरी सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मोटारसायकलवर काही हौशी नागरिक शहरात भ्रमण करतात. पोलिसांची गाडी दिसली की लपायचे व पोलीस गाडी गेल्यानंतर पुन्हा शहरात भटकंती करायची, असा प्रकार सुरू आहे. अशा मोटारसायकलस्वारांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा, कृषीविषयक सेवा व शासकीय वाहने वगळता इतरांना पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी शहर व परिसरातील पेट्रोल पंपावर सहजरीत्या पेट्रोल-डिझेल मिळत असल्याने याचा गैरफायदा काही नागरिकांकडून घेतला जात आहे. पेट्रोलपंप चालकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आदेश असले तरी त्याचे उल्लंघन होत असल्याने अशा पेट्रोलपंप चालकांवरही प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक शनिवार व रविवारी प्रशासनाने जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या दोन दिवसांत वैद्यकीय प्रतिष्ठान वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शासकीय नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन नगरपालिका, पोलीस व महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.