शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

76 गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: पेसा क्षेत्राबाहेरील नंदुरबार व शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार: पेसा क्षेत्राबाहेरील नंदुरबार व शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील ४१ तर शहादा तालुक्यातील ३५ अशा ७६ ग्रामपंचायतींची सोडत काढण्यात आली.  दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील न्याहली ही ग्रामपंचायत एस.टी.प्रवर्गासाठी तर जूनमोहिदा ही एस.सी.प्रवर्गासाठी राहणार आहे. तर शहादा तालुक्यातील पुसनद ही एस.टी. तर टेंभे ता.शहादा व कुढावद तर्फे सारंगखेडा या ग्रामपंचायती एस.सी. प्रवर्गासाठी राखीव राहतील.२०२० ते २०२५ या दरम्यानच्या कालावधीतील हे आरक्षण राहणार आहे. नंदुरबार तालुका           नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवार, २९ रोजी सकाळी तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. ४१ पैकी दोन ग्रामपंचायती या एस.सी. व एस.टी.प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित ग्रामपंचायती या खुला व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असतील. खुला प्रवर्गासाठी २८ तर ११ ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असतील. यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व त्या त्या ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होेते. या ग्रामपंचायतींमधून महिला राखीव ग्रामपंचायतींची    सोडत  ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शहादा तालुक्यात ३५            तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २९ डिसेंबर  रोजी सकाळी मोहिदा रोड येथील नवीन तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काढण्यात आली.३५ ग्रामपंचायतींपैकी अनुसुचित जातीसाठी एक ,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दहा व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी     दिलीसरपंच पद वेगवेगळ्या प्रवर्गासाठी पाच वर्षाकरिता (एप्रिल २०२० ते मार्च २०२५) गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आली आहे.           दरम्यान, आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. निवडणुकीत अनेकांनी खर्च केला. परंतु आरक्षण वेगळे निघाल्याने आता अशा इच्छुकांना दुसरऱ्याला सरपंच करावे लागणार आहे. याशिवाय येत्या ४ फेब्रुवारी रोजी महिला आरक्षण काय निघते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने आता तयारीला वेग आला आहे. अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावून ठेवली आहे. साधारणत: १५ फेब्रुवारीच्या आत सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.  

नंदुरबार तालुक्यातील आरक्षण सोडत

  • एस.टी.प्रवर्गासाठी राखीव : न्याहली 
  •  एस.सी.प्रवर्गासाठी राखीव : जुनमोहिदा
  •  खुला प्रवर्गासाठी राखीव : हाटमोहिदा, बोराळे, सातुर्खे, ओसर्ली, तिसी, होळतर्फे रनाळा, समशेरपूर, कानळदे, नाशिंदे, आराळे, कार्ली, निंभेल, काकर्दा, विखरण, बलवंड, बह्याणे, सैताणे, कलमाडी, रजाळे, कंढ्रे, सिंदगव्हाण, भालेर, रनाळे, मांजरे, खोंडामळी, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, आसाणे.
  •  नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव : तलवाडे बुद्रूक, अमळथे, कोपर्ली, तिलाली, बलदाणे, भादवड, नगाव, खोक्राळे, वैंदाणे, घोटाणे, खर्देखुर्द.

शहादा तालुक्यातील आरक्षण सोडत

  •  एस.टी.प्रवर्गासाठी राखीव : पुसनद. 
  •  एस.सी.प्रवर्गासाठी राखीव : टेंभे तर्फे शहादा, कुढावद तर्फे सारंगखेडा.
  • खुला प्रवर्गासाठी राखीव : अनरद , कळंबु , कानडी तर्फे शहादा. , कुकावल , खैरवे / भडगाव , टेंभे तर्फे सारंगखेडा , तोरखेडा , देऊर / कमखेडा, पळासवाडा, फेस, बामखेडा तर्फे त-हाडी, बिलाडी तर्फे सारंगखेडा, मनरद, मोहिदे तर्फे शहादा, लांबोळा, वरुळ तर्फे शहादा, वर्ढे तर्फे शहादा, शेल्टी, सारंगखेडा, सावळदा, हिंगणी, कोठली तर्फे सारंगखेडा
  • नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव : कौठळ तर्फे सारंगखेडा , सोनवद तर्फे शहादा,  बामखेडा तर्फे सारंगखेडा, करजई, डामरखेडा, ससदे,  दोंदवाडे,   शिरुडदिगर, पुरुषोत्तम नगर,  नांदरखेडा