हाय रिस्क १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:38 IST2020-06-07T11:38:21+5:302020-06-07T11:38:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/विसरवाडी/सारंगखेडा : विसरवाडी, शहादा व सारंगखेडा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...

Reports of 18 high risk people are negative | हाय रिस्क १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

हाय रिस्क १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/विसरवाडी/सारंगखेडा : विसरवाडी, शहादा व सारंगखेडा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालांकडे गेल्या चार दिवसांपासून लक्ष लागून होते. शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल, सारगंखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कातील चार आणि म्हसावद येथील एक असे पाच आणि विसरवाडी येथील सहा जणांचा त्यता समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे मालेगावहून नवापूर येथे आलेल्या एका ग्रामसेविकेचा अहवालदेखील निगेटिव्ह आला. तसेच घोगलपाडा येथील एका व्यक्तीचा संपर्क नंदुरबार येथील पॉझिटिव्ह रूग्णाशी आला होता त्या व्यक्तीच्या अहवाल देखील निगेटिव्ह आला. दोन खाजगी डॉक्टर, एक परिचारिका, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच रुग्णवाहिका चालकाचा त्यात समावेश आहे.
मालेगाव येथून सारंगखेडा येथे आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार व्यक्ती आणि म्हसावद येथील एक व्यक्ती असे पाच नमुने निगेटीव्ह आले आहेत. परिणामी ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील गरीब नवाज कॉलनी परिसरात लागोपाठ दोन कोरोना बाधीत रुग्ण शहरात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर हे दोन्ही रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर स्वॅब नमुने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते.
या दोन्ही रुग्णांच्या अतिसंपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तालुक्यातील तिन्ही रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Reports of 18 high risk people are negative