शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, १० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 21:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रविवारी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रविवारी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकुण रुग्णसंख्या आता १६३ झाली आहे.रविवारी आढळून आलेल्या सहा नवीन रुग्णांमध्ये नंदुरबार शहरातील तीन, धुळवद, ता.नंदुरबार, तळोदा व शहादा येथील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. नंदुरबार शहरात कोकणी हिल परिसरातील साईबाबा नगर येथील ३७ वर्षीय महिला, सिद्धी विनायक चौक मंगळबाजार परिसरातील २८ वर्षीय महिला, वृंदावन कॉलनी येथील ५० वर्षीय महिला, धुळवद ता़ नंदुरबार येथील ४७ वर्षीय पुरुष, तळोदा येथील खान्देशी गल्लीतील ५३ वर्षीय पुरुष तर शहादा शहरातील गणेश नगरातील ४२ वर्षीय पुरुष अशा सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ रविवारी २९ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत़याशिवाय १० जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. त्यात नंदुरबारातील एक तर तळोदा येथील सहा, लोणखेडा, मोलगी व मंदाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ७० झाली आहे.तळोदा येथील मुंबई येथून परतलेल्या कोरोनाची लक्षणे असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात मयत महिलेच्या मुलाचा अहवाल सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला होता़ दरम्यान त्याच्या संपर्कातील सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्क साखळीत १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती़यातील तब्बल सहा जणांनी कोरोनाशी लढा देत त्यावर मात केली आहे. यात मोठा माळीवाडा भागातील चार, काकाशेठ गल्ली एक तर शिवराम नगरातील एक अशा सहा जणांचा समावेश आहे़ शनिवारी महिलेच्या मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर उर्वरित बारा जणांपैकी सहा जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने ते शहरवासीयांसाठी दिलासादायक वृत्त ठरले आहे. असे असले तरी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २५ जून रोजी तळोदा येथील मीरा कॉलनीतील एका दाम्पत्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तळोद्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर गेली होती. आता त्यातील सात जण कोरोणामुक्त झाले असून आठ जणांवर उपचार सुरू आहेत.नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला येथील १, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा येथील प्रत्येकी एक आणि मोलगी येथील एक अशा चौघांनाही रविवारी घरी सोडण्यात आले़ सर्व १० रुग्णांना आरोग्य विभागाने सन्मानपूर्वक शुभेच्छा देत घराकडे रवाना केले़